sushma andhare

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ) यांच्या मुक्ताईनगरमधील सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. ज्या मैदानावर सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. तिथे महाआरतीचं आयोजन करण्यात आल्याचं कारण देत सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.

    जळगाव: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ) यांच्या मुक्ताईनगरमधील सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. ज्या मैदानावर सुषमा अंधारे यांची सभा होणार होती. तिथे महाआरतीचं आयोजन करण्यात आल्याचं कारण देत सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. अचानक सभेला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर सुषमा अंधारे या संतप्त झाल्या आहेत. सभा घेईल तर तिथेच, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. त्यामुळे जळगावमधील वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्यानंतर सुषमा अंधारे यांनी मीडियाशी संवाद साधला. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आम्ही सभा घेऊ, असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे.

    काय म्हणाल्या अंधारे?
    महाप्रबोधन यात्रा हा आमचा राज्याचा कार्यक्रम आहे. आम्ही तीन आठवडे आधीच परवानगी मागितली आहे. पोलिसांनी सभेला परवानगी नाकारण्याचे काही एक कारण नव्हतं.दुसऱ्या गटाने महाआरतीचा कार्यक्रम ठेवला आहे असं कारण पोलिसांनी दिले. पण त्या मैदानावर कुठलही मंदिर नाही, त्यामुळे अचानक महाआरती कशी काय उद्भवली? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.सभेला परवानगी द्यावी म्हणून सकाळी पोलीस अधीक्षकांसोबत एक बैठक पार पडली आताही दुसरी बैठक होईल. पोलिसांनी निरपेक्ष बुद्धीने काम केलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून काम करू नये.आम्ही हे प्रकरण अतिशय शांततेने हाताळत आहोत. कायद्याचा आदर करत आहोत. मग पोलीस हे प्रकरण इतकं का ताणतंय? जास्त ताणलं की तुटतं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

    दरम्यान, सुषमा अंधारे यांच्यासह पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सभेलाही परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी जिल्ह्यात कलम 144 लागू केलं आहे.मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन सभेदरम्यान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची देखील सभा होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही गटाच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.