उद्याच्या मेळाव्यात काही भूमिका राजकारणाला साजेशाही घेऊ शकतो, मनसे आमदार राजू पाटील यांचे सूतोवाच

राज ठाकरे हे सरळ भूमिका घेऊन चाललेत त्यांना लोकांचं प्रेम मिळत होते. मात्र मतदानात प्रतिसाद मिळत नव्हता, आता काही भूमिका राजकारणाला साजेशाही घेऊ शकतो.

  उद्या मनसेचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने राज ठाकरे नाशिकमध्ये मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार, काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आमचा पक्ष उद्या अठराव्या वर्षात पदार्पण करतोय, एका अर्थाने पक्ष वयात आलाय, काही गोष्टी आम्ही करू शकत नव्हतो अशाही करणार. राज ठाकरे हे सरळ भूमिका घेऊन चाललेत त्यांना लोकांचं प्रेम मिळत होते. मात्र मतदानात प्रतिसाद मिळत नव्हता, आता काही भूमिका राजकारणाला साजेशाही घेऊ शकतो. कारण शेवटी राजकारण आम्हालाही करायचंय त्याअनुषंगाने उद्याच्या मेळाव्यात सूतोवाच होऊ शकतात असे सूतोवाच राज ठाकरे करतील. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा नेतृत्व करावं अशा लोकांच्या अपेक्षा आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी राज ठाकरे यांच्या विचारांवर व बोलण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे त्याचे प्रेडिक्शन मी करू शकत नाही मात्र आमची तयारी जोरात सुरू आहे असे सांगितले.

  मनसे देखील लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघाचा आढावा घेते. मात्र अद्याप मनसेची लोकसभा निवडणुकीसाठी काहीच स्पष्टता दिसून येत नाही. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभा नाही तर इतर लोकसभांच्या बाबतीत देखील आढावा बैठक सुरू आहेत किती जागा लढायच्या, जागा लढायच्या की नाही, एकट्याने लढायचं की युतीत लढायचं हे सर्व निर्णय अजून बाकी आहेत. या निवडणुका 4 टप्प्यात चालू शकतात, पंधरा मे पर्यंत सरकार बसलं पाहिजे, त्यामुळे महाराष्ट्राचा टप्पा कधी येतो आणि त्या टप्प्यात राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहण्यासाठी सगळ्यांसोबत आम्ही देखील उत्सुक असल्याचे सांगितले.

  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून मनसे आमदार राजू पाटील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी 2014 साली देखील मी या ठिकाणाहून मनसेचा लोकसभा उमेदवार होतो. त्यावेळेस देखील लाखाहून अधिक मतं घेतली होती. त्याआधी वैशाली दरेकर 2009 ला लोकसभेच्या उमेदवार होत्या. लाखांच्यावर आम्ही दोन्ही वेळेस मतं घेतली आहेत. यंदा दोन पक्षांचे चार पक्ष झालेत सत्ताविरोधी वातावरण आहे. कोणीही लोकप्रतिनिधी असेल किती काम झाले तरी लोक समाधानी राहू शकत नाही हा एक नियम आहे. कल्याण पूर्वेत राजकीय चढा ओढीतून जी घटना घडली त्याबाबत जनतेमध्ये नाराजी आहेच, या नाराजीचा फायदा तर आम्हाला घ्यायचा असेल तर पक्ष विचार करेल किंवा आम्हाला जे सांगतील त्याला आम्ही तयार आहोत असे सांगितले.

  मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
  कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 14 गाव नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी निर्णय काल घेण्यात आला. तसेच सत्तावीस गावातील मालमत्ता करप्रकरणी देखील निर्णय घेण्यात आला. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभार मानले. यावेळी बोलताना राजू पाटील यांनी खरंतर हा निर्णय आधी जाहीर करायला पाहिजे होता. आणखी काही डेव्हलपमेंट करता आली असती मात्र निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय जाहीर केला. मात्र निर्णय जाहीर केला त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे असे सांगितले.

  लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूका अधिक  मनोरंजक होतील – मनसे आमदार राजू पाटील
  महायुतीतल्या जागावाटपण बाबत बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र अद्यापही जागा वाटपाचा घोळ काही सुटलेला नाही. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा लक्ष केले. राजू पाटील यांनी सांगितले की हे तर सुरुवात आहे, लोकसभा हे निभावून येतील मात्र विधानसभेत दोघांचे भांडण होते. एकमेकांचे डोके फोडतील सध्या राज्यात राजकीय गोंधळ उडाला कोणाचा पायपुस कोणाला राहिलेला नाही त्यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुका मनोरंजक होतील असं मत मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले.