राज्यातील ९३ नगरपंचायतींसह भंडारा, गोंदीया जिल्हा परिषदेसाठी आज मतदान, मतमोजणी १९ तारखेला

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठीही आज मतदान होत आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्त जागांसाठीही मतदान आज होतं आहे. तसेच, उद्या (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

  मुंबई : OBC आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर राज्यातील जवळपास ३० जिल्ह्यांतील ९३ नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. नगरपंचायत निवडणुकींसोबतच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही आज मतदान आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी अनुक्रमे १३ आणि १० जागांसाठी मतदान पार पडते आहे.

  भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठीही आज मतदान होत आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्त जागांसाठीही मतदान आज होतं आहे. तसेच, उद्या (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

  नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ८ जागांसाठी आज मंगळवारी मतदान होणार असून, दुसऱ्या टप्यात २० उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीचा निकाल बुधवारी १९ जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यात तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे देवळा येथे ४, निफाड ३, कळवण आणि दिंडोरी येथे प्रत्येक २ जागांवर अशा एकूण ११ जागांची निवड स्थगित करून येथे सोडत काढून पुन्हा प्रक्रिया घेण्यात आली. या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

  मतदान होत असलेल्या नगरपंचायती

  ठाणे– मुरबाड व शहापूर, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित),

  रत्नागिरी– मंडणगड, दापोली,

  सिंधुदुर्ग– कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे,

  पुणे– देहू (नवनिर्मित),

  सातारा– लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी,

  सांगली– कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित),

  नाशिक– निफाड, देवळा, कळवण, दिंडोरी धुळे- साक्री,

  नगर– अकोले, कर्जत, पारनेर,

  जळगाव– बोदवड,

  औरंगाबाद– सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी- पालम, बीड- केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,

  लातूर– जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ,

  उस्मानाबाद– वाशी, लोहारा बु., नांदेड- नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ,

  अमरावती– भातकुली, तिवसा,

  बुलडाणा– संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, वाशीम- मानोरा,

  नागपूर– हिंगणा, कुही, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर,

  भंडारा– मोहाडी, लाखनी, लाखांदूर,

  गोंदिया– सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, चं

  चंद्रपूर– सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही,

  गडचिरोली– अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा.