पिंपरी : दिवाळीनिमित्त फोडण्यात येणारे फटाके, वाहनांचा धूर, बांधकामांमुळे शहरातील हवेची पातळी धोकायदाक झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील सर्व बांधकामे 19 नोव्हेंबरपर्यंत बंदठेवण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. तसेच हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी रस्त्यांची रोडवॉशर सिस्टीम असलेल्या वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येत आहे.
लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीच्या दिवशी शहरातील सूक्ष्म धूलिकणांमध्ये दुप्पट वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता खालावली आहे. हिवाळ्यात जमिनीवरील धुलिकण हेवत जाऊन हवा प्रदूषित होते. त्यात फटाक्यांची भर पडत आहे. त्यामुळे शहरातील हवेची पातळीधोकादायक श्रेणीत गेली आहे. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने 32 प्रभागांमध्ये 16 वायू प्रदूषण नियंत्रणपथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांद्वारे प्रभागातील बांधकाम स्थळांना भेटी देऊन छायाचित्रे, चित्रफितीद्वारे त्याची नोंदघेण्यात येत आहे.
या दरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास दंड आकारला जात आहे. नोटीस देऊन कामाची जागा सीलकेली जात आहे. दैनंदिन वायू प्रदूषण निरीक्षण केले जाते. शहरातील ढाबा, बेकरी, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स मालकांनी स्वयंपाकघरातपर्यावरणपूरक पर्यांयांचा वापर करावा. तसेच डिझेल जनरेटरचा वापर करण्याचे शक्यतो टाळावे. शहरातील हवेची गुणवत्तावाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) सफर या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही नोंद झाली आहे. अतिसूक्ष्मधूलिकण (पीएम 2.5) आणि सूक्ष्म धूलिकणात (पीएम 10) वाढ झाल्याने शहराच्या काही भागातील हवेची गुणवत्ता चक्क खराबश्रेणीपर्यंत पोचली होती. सफर या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्तासर्वात खराब श्रेणीत नोंदली गेली आहे.