पालिकेचा भोंगळ कारभार, दिवसा उजेड रात्री अंधार; रस्त्यावरील पथदिवे अखंडीतपणे सुरु

म्हसवड (Mhaswad) नगरपरिषद (Nagarparishad) हद्दीतील विरकरवाडी याठिकाणी गत एक महिन्यांपासून रस्त्यालगत उभारलेले पथदिवे अखंडीतपणे सुरु असून याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करुन देखील पालिका प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीच उपाययोजना केली नसल्याने या ठिकाणी पथदिवे अखंडीतपणे सुरु आहेत. पालिकेचा हा कारभार म्हणजे दिवसा उजेड अन रात्रीचा अंधार अशी असे चित्र सध्यातरी येथे दिसत आहे.

    म्हसवड : म्हसवड (Mhaswad) नगरपरिषद (Nagarparishad) हद्दीतील विरकरवाडी याठिकाणी गत एक महिन्यांपासून रस्त्यालगत उभारलेले पथदिवे अखंडीतपणे सुरु असून याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करुन देखील पालिका प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीच उपाययोजना केली नसल्याने या ठिकाणी पथदिवे अखंडीतपणे सुरु आहेत. पालिकेचा हा कारभार म्हणजे दिवसा उजेड अन रात्रीचा अंधार अशी असे चित्र सध्यातरी येथे दिसत आहे.

    म्हसवड नगरपरिषदेने शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली शहराला जोडणाऱ्या सर्व वाड्या वस्त्यांवर पथदिवे लावले खरे मात्र त्यानंतर त्याची देखभाल दुरुस्तीच पालिका प्रशासन विसरले आहे. शहरात लावलेले अनेक पथदिवे बंद अवस्थेत असून ते केवळ एक शोपिस बनले आहेत. तर अनेक ठिकाणचे पथदिवेच तर गायबच झाले आहेत. जे काही सुरु आहेत ते पथदिवे अखंडीतपणे सुरुच राहतात.

    सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. मात्र ही राजवट सुरु होण्यापूर्वी पालिकेत ज्यांची सत्ता होती अथवा जे या पालिकेचे सदस्यत्व करीत होते त्यांनी आपला वार्ड, प्रभाग लखलखीत व्हावा यासाठी पालिकेच्या माध्यमातून हे पथदिवे बसवले. पण आपला कार्यकाल संपल्यावर जणु काही आपला अन त्या प्रभागाचा आता काही संबंधच नाही अशाच प्रकारे सध्या प्रत्येक सदस्य वागताना दिसत आहे. पथदिव्यांबाबत सध्या सुरु असलेला खेळ हे सर्व सदस्य दररोज उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. मात्र त्याबाबत त्या सर्वांनीच मौनीबाबाचे रुप धारण केले आहे.

    गावपुढाऱ्यांना पथदिव्यांचा उजेड झाला दिसेनासा

    राजकारणाकरीता किरकोळ कारणावरुन प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या या गावपुढाऱ्यांना पथदिव्यांचा उजेड दिसेनासा झाला आहे. एकीकडे म्हसवड शहर व परिसरातील शेतकऱ्यांना पुरेशी विज उपलब्ध होत नसल्याने त्यांचे कृषी पंप चालत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मागील आठवड्यात याच परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पुरेशी विज उपलब्ध व्हावी यासाठी थेट आ. जयकुमार गोरे यांचे निवास्थान गाठत आपल्या शेतीची व पिकांची विजे अभावी होत असलेली कर्मकहाणी त्यांच्या समोर मांडत यावर ठोस उपाययोजना राबवण्याची विनंती केल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे याच शहरात पथदिव्याची विज केवळ दुर्लक्षामुळे वाया जात असल्याचेही चित्र आहे. विज वाचवणे म्हणजेच विज उपलब्ध करण्यासारखे आहे, असे वारंवार विज कंपनीकडून सांगितले जात असले तरी अशी वाया जाणारी विज वाचवण्यासाठी प्रत्येकानेच पुढे येवुन आपले कर्तव्य निभावण्याचीही गरज आहे. तरच विजेची बचत होणार आहे.