आवाजाचा बादशहा ‘अरिजित सिंग’चा पुण्यातील कार्यक्रम ओहर फ्लो; कार्यक्रमाचे ठिकाण अन् तारीख बदलली..!

 देशासह जगभरात आपल्या आवाजाने तरुणाईची मने जिंकत, त्यांना वेड लावणारा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगचा पुण्यातील कार्यक्रम जाहीर होताच काही दिवसातच 'ओहर फ्लो' झाला आहे. त्यामुळे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, आता या कार्यक्रमाची तारीख बदलली गेली आहे.

    पुणे : लोकप्रिय गायक ‘अरिजीत सिंग’च्या आवाजाने पुन्हा एकदा पुणेकरांचे (Arijit Singh Pune Show) काळीज धडधडणार आहे.  देशासह जगभरात आपल्या आवाजाने तरुणाईची मने जिंकत, त्यांना वेड लावणारा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगचा (Arijit Singh Song) पुण्यातील कार्यक्रम जाहीर होताच काही दिवसातच ‘ओहर फ्लो’ झाला आहे. त्यामुळे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, आता या कार्यक्रमाची तारीख बदलली गेली आहे.

    गायक प्रेमींनी पहिल्या काही दिवसांतच ‘तिकीट’ फुल केल्याने या कार्यक्रमाचे ठिकाण देखील बदलावे लागत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. पुढील महिन्यात (दि. 17 मार्च) हा कार्यक्रम पार पडणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध टू-बीएचकेकडून गेल्या वर्षी ‘राजा बहाद्दुर मिल्स’ येथे गायक अरिजित सिंहचा कार्यक्रम घेतला होता. त्याला रसिक पुणेकरांनी प्रचंड दाद दिली होती. त्यानंतर आता यावर्षीही आवाजाचा बादशहा मानल्या जाणाऱ्या अरिजितचा कार्यक्रम आयोजित केला आहे. 3 मार्च रोजी हा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी 17 हजार बैठक व्यवस्था केली होती. परंतु, तिकीट विक्री काही दिवसांत संपत ओहर फ्लो झाली. त्यासोबतच रसिकांकडून तिकीटाची मागणी होऊ लागली. त्यामुळे रसिकांच्या मागणीला मान देऊन आयोजकांनी हा कार्यक्रम पुढे ढकलत तो १७ मार्च रोजी ठेवला आहे.

    कार्यक्रमाचे ठिकाण देखील बदलले गेले असून, आता २५ हजारांहून अधिक क्षमता असलेले ठिकाण ठेवण्याचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावेळी पुणेकर आणि अरिजीत सिंग’ प्रेमींना हा कार्यक्रम नव्या ढंगात आणि नव्या रूपात पाहिला आणि ऐकायला मिळणार आहे.