heatwave in mumbai

जून महिन्यातही उकाडा जाणवत आहे. विदर्भात तर पारा आणखीनच वाढलेला आहे. विदर्भातील अनेक भागात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave In Vidarbha) इशारा देण्यात आला आहे.

    पुढच्या दोन दिवसांत कोकणात मान्सून (Monsoon) दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. कर्नाटकमधील कारवारमध्येच मान्सून रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोसमी वारे येण्याची वाट पहावी लागणार आहे. अशातच विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची (heat Wave In Vidarbha) शक्यता हवामान विभगाने (IMD) वर्तवली आहे.

    जून महिन्यातही उकाडा जाणवत आहे. विदर्भात तर पारा आणखीनच वाढलेला आहे. विदर्भातील अनेक भागात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

    जून महिना सुरू झाल्यानंतर पाऊस पडून तापमान कमी होईल, अशी आशा होती. पण या सीझनचा तापमानाचा उच्चांक काल नागपुरात नोंदवला गेला आहे. नागपुरात काल ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपुरात काल ४६.४ तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांना आगामी आठवड्यात उष्ण तापमानाला सामोरे जावे लागणार आहे.

    केरळमध्ये २९ मे रोजी मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर ३१ मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवारपर्यंत पोहोचला आहे. मात्र नैऋत्य वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे मान्सून कर्नाटकातच रेंगाळला आहे. तिथे देखील पावसाचा जोर अधिक नसून ७ जून नंतर पावसाचा जोर दक्षिण भारतात वाढेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

    तळकोकणात मान्सून ८ ते ९ जून रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे. तर मुंबई १२ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत ८ जूननंतर पूर्वमोसमी पावसाचा जोर बघायला मिळेल. मात्र, पुढील आठवड्यातदेखील पावसाचा हवा तसा जोर नसणार आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.

    दक्षिण भारतात ७ जूननंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर कमकुवत असल्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाची वाटच बघावी लागणार आहे.