गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, मराठवाडा , मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्रात(Heavy Rain In Maharashtra) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रीवादळाच्या(Effect Of Gulab Cyclone In Maharashtra) कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम दिसणार आहे. येत्या २४ तासांमध्ये मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ (Gulab Cyclone)चक्रीवादळ निवळले आहे. त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात(Heavy Rain In Maharashtra) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रीवादळाच्या(Effect Of Gulab Cyclone In Maharashtra) कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासांमध्ये मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    ‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र किनारपट्टीच्या भागात वादळामुळे नुकसान झाले. सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे.


    पुढील ३-४ तासात धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

    राज्यात पुढील २४ तासात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे विदर्भात प्रभाव कमी असणार असून बुधवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव राहिल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.