संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

येत्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीची (Rain in Maharashtra) शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मुंबई : येत्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीची (Rain in Maharashtra) शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

राज्यातील अनेक भागात हवामान बदलामुळे पाऊस पडत आहे. फेब्रुवारीमध्ये अचानक हवामानात बदल झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण ऐन रब्बी पिकांच्या काढणीवेळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत.

त्यात आता पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, बीड आणि उत्तर मध्ये महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता आहे. तर बदलापूरलाही हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

धुळ्यात मुसळधार पावसाने नुकसान

धुळे जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळ आणि पावसामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळी साडेसातला जोरदार वादळ झाले. जमिनीवरील सटरफटर वस्तू, झाडांचा पालापाचोळा वावटळीमुळे हवेत उंचावर उडून गेला. धुळीने आसमंत भरून गेल्यानंतर वीज गडप झाल्याने अंधारात काहीच दिसेनासे झाले. सुमारे १५ मिनिटे टिकलेल्या वादळाने केळीच्या बागा मोडून पडल्या. केळीचे लोंगर भुईसपाट झाले.

शेतीचे नुकसान

अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहे. काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विकारांचे आजार तसेच वातावरणातील बदलामुळं विविध आजार होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस म्हणजे 4 ते 8 मार्चपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.