devendra fadnavis

नाराज असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक नॉट रिचेबल (Not Reachable) झाले. आता ते सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये गेले आहेत. एकनाथ शिंदे काही आमदारांसह सुरतमध्ये गेल्यानंतर इकडे भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यसभा आणि आता विधान परिषद निवडणुकांमधील विजय खेचून आणणारे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सक्रिय झाले आहेत. ते दिल्लीला रवाना झाले आहेत.

    मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. काल विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटली. आधीपासूनच नाराज असलेले एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल (Not Reachable) झाले. आता ते सुरतमधील ली मेरिडियन हॉटेलमध्ये गेले आहेत.

    एकनाथ शिंदे काही आमदारांसह सुरतमध्ये गेल्यानंतर इकडे भाजपाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यसभा आणि आता विधान परिषद निवडणुकांमधील विजय खेचून आणणारे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सक्रिय झाले आहेत. ते दिल्लीला रवाना झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस  (Operation Lotus In Maharashtra) होणार का ? असा प्रश्न आज अनेकांना पडला आहे.

    महाराष्ट्राआधी गोवा, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक यासह अनेक राज्यांमध्ये भाजपाने ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेत भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचा पाठिंबा मुख्यमंत्रीपदावरून अडला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

    गुजरातचे भाजपाचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि भाजपाचे खासदार तसेच सी. आर. पाटील या दोघांचा ली मॅरिडियनमध्ये मुक्काम आहे. दोघेही नेते ठाण मांडून बसले आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीला तर दुसरीकडे सुरतमध्ये खलबते सुरू आहेत.  महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू झाले आहेत.