MPSC उत्तीर्ण दर्शना पवारच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक वास्तव समोर; अपघात की हत्या? संशय फिटला…

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या (MPSC Pass Student) आणि वनाधिकारी असलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) या तरुणीचा मृतदेह राजगड परिसरात (Rajgad Fort) सापडला होता. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. दर्शनाचा मृतदेह तीन दिवसांनंतर अत्यंत वाईट अवस्थेत सापडला होता. तिची हत्या करण्यात आली की हा अपघात होता, असा प्रश्न त्यानंतर उपस्थित करण्यात येत होता.

    पुणे : एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या (MPSC Pass Student) आणि वनाधिकारी असलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) या तरुणीचा मृतदेह राजगड परिसरात (Rajgad Fort) सापडला होता. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. दर्शनाचा मृतदेह तीन दिवसांनंतर अत्यंत वाईट अवस्थेत सापडला होता. तिची हत्या करण्यात आली की हा अपघात होता, असा प्रश्न त्यानंतर उपस्थित करण्यात येत होता. तिच्यासोबत असलेला तिचा मित्र राहुल हंडोरेही अद्याप बेपत्ता आहे. त्यामुळे ही हत्याच असावी, असा संशय बळावत होता. त्यात आता दर्शना पवार हिच्या मृतदेहाच्या पोस्टमार्टम (Darshana Pawar Postmortem Report) रिपोर्टमध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

    काय आहे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये?

    12 जून रोजी दर्शना आणि तिचा मित्र राहुल हे राजगड परिसरात ट्रेकिंगला गेले असल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर 18 जूनला दर्शनाचा मृतदेह राजगड परिसरात सापडलेला आहे. तिच्या मृतदेहाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा असल्याचं समोर आलंय. त्यामुळं हा अपघात नसून तिची हत्याच झाली असल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता तिच्यासोबत असणारा तिचा मित्र राहुल हंडोरे कुठं आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत.

    कोण आहे राहुल हंडोरे?

    राहुल हंडोरे हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शाहवाडीचा रहिवासी आहे. त्यानं बीएससीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. तो एमपीएससी करण्यासाठी पुण्यात आला होता. याच काळात दर्शना आणि राहुल यांची ओळख झाली. गेल्या काही महिन्यांत ते एकमेकांच्या चांगल्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येतंय. 9 जूनला हे दोघंही ट्रेकला गेलो होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे फोन बंद येत होते. दोघांच्या कुटुंबियांनी 12 जूनला हे दोघंही बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलेली आहे.