“सत्ता येते आणि जाते…”, शरद पवार, संजय राऊतांना आलेल्या धमकीवरून प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे.आता त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे.आता त्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीदेखील यावर  भाष्य केलं आहे.
    प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार आणि संजय राऊत यांना अशा प्रकारची धमकी येणं ही खूप गंभीर बाब आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी. सत्ता येते आणि जाते, याच्यात सामान्य माणूस आणि कुठलाही नेता असुरक्षित होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यायला हवी. राज्य सरकार ही दक्षता घेईल अशी आशा आम्ही बाळगतो. या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले, पवार आणि राऊत या दोन्ही नेत्यांना पोलिसांनी सुरक्षा दिली पाहिजे. राजकीय नेते काय सांगतात, काय सांगत नाहीत यापेक्षा पोलीस खातं हे संरक्षणासाठी आहे. पोलीस खातं या दोन्ही नेत्यांना पूर्णपणे संरक्षण देईल अशी अपेक्षा बाळगतो.