Breaking : मुलुंड स्थानकात ऐन गर्दीच्या वेळी बत्ती गुल; प्रवाशांवर आली अंधारात चाचपडत वाट शोधण्याची वेळ

मुलुंड स्थानकात आज संध्याकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास बत्ती गुल झाली होती. जवळपास २५ ते ३० वीज गेली होती. त्यामुळे प्रवाशांना अंधारातच लोकलमध्ये चढावे आणि उतरावे लागत होते.

    मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुलुंड स्थानकात (Mulund Station) आज संध्याकाळी प्रवाशांना एका वेगळ्याच अडचणीच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची नामुश्की ओढवली. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुलुंड स्थानकातील वीज गेल्याने (Power Cuts) प्रवाशांना अंधारात चाचपडत आपली वाट शोधावी लागली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे.

    मुलुंड स्थानकात आज संध्याकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास बत्ती गुल झाली होती. जवळपास २५ ते ३० वीज गेली होती. त्यामुळे प्रवाशांना अंधारातच लोकलमध्ये चढावे आणि उतरावे लागत होते. बत्ती गुल होण्याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी ऐन गर्दीच्या वेळी बत्ती गुल झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल झालेले पाहायला मिळत होते.