दुष्काळी भागाचे देणे लागतो या भावनेतून काम : प्रभाकर देशमुख

खटाव माण तालुक्यांत आपला जन्म झाला आहे. दोन्ही तालुक्यांत लहानाचे मोठे झालो, मोठे झाल्यानंतर प्रांत, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अशा मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. लाल दिव्याच्या गाडीतून राज्यभर फिरलो. हे सर्व दुष्काळी भागातील जनतेच्या आशिर्वादामुळेच शक्य झाले.

  कातरखटाव : खटाव माण तालुक्यांत आपला जन्म झाला आहे. दोन्ही तालुक्यांत लहानाचे मोठे झालो, मोठे झाल्यानंतर प्रांत, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अशा मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. लाल दिव्याच्या गाडीतून राज्यभर फिरलो. हे सर्व दुष्काळी भागातील जनतेच्या आशिर्वादामुळेच शक्य झाले. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने आपण सामाजिक, राजकीय जीवनात कार्यरत आहोत, असे प्रतिपादन खटाव माण राष्ट्रवादीचे नेते व निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी केले.

  देशमुख यांच्या प्रयत्नातून खटाव माण तालुक्यातील ४८ गावांना टेंभू योजनेतून अडीच टीएमसी पाणी राखीव झाल्याबद्दल त्यांचा निमसोड गट राष्ट्रवादी काँग्रेस व एनकुळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

  यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा. बंडा गोडसे, संदिप मांडवे, श्रीमंत पाटील, शशिकला देशमुख, शशिकांत मोरे, डॉ.संतोष देशमुख, शिवाजीराव साबळे, नगरसेवक विलास पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

  देशमुख म्हणाले, शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे हे पाणी आपणांस मिळाले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विशेष योगदान लाभले आहे. या कामाच्या सर्वेक्षणासाठी राज्य शासनाने पाच कोटी रूपयांची तरतूद केली आहे. लोकांनी जेवढे पाणी मिळाले आहे. त्यासाठी आनंद व्यक्त करावा. तसेच आणखी वाढीव पाण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे.

  प्रा. अर्जुनराव खाडे म्हणाले, एनकूळ परिसराला शेती पाणी मिळावे याकरीता आपण १९९६ पासून तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत होतो. देशमुख साहेबांच्या रेट्यामुळे आपल्या भागाला पाणी मिळणार आहे. पाण्यासाठी सांगली जिल्ह्याप्रमाणे आपल्या तालुक्यातील लोकांनीही एकत्र येण्याची गरज आहे.

  यावेळी प्रा. गोडसे, विधाते, मोरे, मांडवे यांनी देशमुख साहेबांच्या प्रशासकीय अभ्यासामुळेच दुष्काळी भागाला टेंभूचे पाणी आरक्षित झाले असल्याचे आपल्या भाषणात मत व्यक्त केले. तसेच त्यांच्यामुळेच दोन्ही तालुक्यांचा कायापालट होणार असल्याचा आशावाद व्यक्त करीत त्यांच्या पाठीशी जनतेने ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी प्राचार्य आनंदराव घोरपडे, शिवाजी साबळे, यांची मनोगते झाली.

  शकील मुजावर, भाऊसाहेब खाडे यांनी सुत्रसंचालन केले. विजय उर्फ मुन्ना खाडे यांनी आभार मानले.

  कार्यक्रमास डॉ. प्रकाश पाटोळे, ॲड. नितीन शिंगाडे, पोपट पाटील, सुशिल डोईफाडे, संतोष देशमुख, आकाराम बोंडके, प्रभाकर निकम, शिवाजी दुबळे, हणमंत सुर्यवंशी, विष्णूपंत निकम, शरद चव्हाण, सुनिल फडतरे, सदाशिव खाडे, मा. ए.खाडे, रामभाऊ खाडे, नाना पाटील, बापूराव नांगरे, अनिल खाडे,धनाजी लवळे, सुनिल खाडे,रवींद्र सानप,पंढरीनाथ खाडे, प्रसाद बागल, बाळासाहेब पोळ, लक्ष्मण गुरव, अमोल यलमर, अफसाना मुजावर, आक्काताई डोईफोडे आदी मान्यवरासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  सत्कार व पक्षप्रवेशही…

  कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनिय काम केल्याबद्दल शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, जयकर खाडे, हणमंत सुर्यवंशी,ओंबासे यांचा सत्कार करण्यात आला. तर अल्लाउद्दीन खोत, करीम खोत, सचिन नाकाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.