प्रदीप कुरुलकरांची सखोल चौकशी राज्य सरकारने करावी, सभागृहात पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी…

एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात ही माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. कुरुलकरांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी कुरुलकरांनी जामीनासाठी अर्ज केला आहे.

    मुंबई : DRDO चे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradip Kurulkar) यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप आहे, दरम्यान, सध्या कुरुलकर या शिक्षा भोगत आहेत. परंतु कुरुलकरांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. याचे आज पडसाद विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात उमटले. प्रदीप कुरुलकरांनी त्यांच्या मोबाईलमधील सगळा डेटा डिलीट केला आहे. कुरुलकर याच्याकडील असलेला मोबाईलचे “डेटा रिट्रीव्ह” करण्याचे काम सुरू आहे. गुजरात मधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी मोबाईल पाठवला आहे. प्रदीप कुरुलकर झारा दास गुप्ता हिच्याशी चॅटिंग करत होते. याची सखोग चौकशी व्हावी अशी मागणी आज विधानसभागृहात काँग्रेस आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. (Pradeep Kurulkar should be thoroughly investigated by the state government, Prithviraj Chavan’s demand in the House)

    कुरुलकरांची सखोल चौकशी व्हावी

    दरम्यान, भारतीय नौदलासाठी डीआरडीओने विकसित केलेल्या क्वाडकॉप्टर या उपकरणाच्या चाचणीचे व्हिडीओ कुरुलकरने पाठवले होते. त्याचबरोबर डीआरडीओ मधील देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ठरणाऱ्या गोष्टींची माहिती कुरुलकर झारा दासगुप्ताला देत होता. एटीएसने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात ही माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली होती. कुरुलकरांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी कुरुलकरांनी जामीनासाठी अर्ज केला आहे.

    काय आहे प्रकरण?

    9ऑक्टोंबर 2022 ते 28  9ऑक्टोंबर 2022या दरम्यान कुरुलकर आणि झारा यांच्यात झालेल्या व्हॉटसप चॅटिंगच्या तपासात ब्राम्होस क्षेपणास्त्र प्रकल्पाची माहिती देणार असल्याची बाब उघड झाली होती. तसेच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप कुरुलकरांवर आहे, अग्नी 6 ची चाचणी घेणार असून त्यावेळी मी तुला याची माहिती देईन, असं कुरुलकरांनी झाराल सागितले होते. यासाठी कुरुलकरांनी मोबाईल चॅट केले होते. मात्र कुरुलकरांना पकडण्यात आले. यानंतर फॉरेस्निस्क लॅबोरेटरीच्या साहाय्याने कुरुलकरने डिलीट केलेला हा डेटा पुन्हा मिळवण्यात आला. त्यातून हे सगळे धक्कादायक खुलासे समोर आलेत.