शिवसैनिकांची निष्ठा शिवसेना आणि ठाकरेंबरोबरच : प्रदिप झणझणे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे इतिहासच घडवणार आहे. ते कपटी, कट-कारस्थान करणाऱ्यांपैकी नाहीत. भाजप पडद्या आडून शकुनीसारखा खेळ खेळत आहे. भाजपने शिवसेनेच्या घरात बंडाचं वादळ उभं केलं आहे.

    फलटण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे इतिहासच घडवणार आहे. ते कपटी, कट-कारस्थान करणाऱ्यांपैकी नाहीत. भाजप पडद्या आडून शकुनीसारखा खेळ खेळत आहे. भाजपने शिवसेनेच्या घरात बंडाचं वादळ उभं केलं आहे. त्यामुळे शकुनी अजुन स्पष्ट काही दिसुन येत नाही. पण लक्षात ठेवा सर्वकाही शांत होईल. तेव्हा सर्वकाही स्वच्छ आणि पारदर्शक स्पष्ट चित्र असेल.

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निस्वार्थी व स्वच्छ व्यक्तीमत्व आहे, आतापर्यंत शिवसेनेवर आलेली बंड त्यांनी मोडीत काढून शिवसेना पुढे न्यायचं काम केलं आहे. हे बंड देखील उद्धवसाहेब व शिवसैनिक लवकरच संपुष्टात आणतील, असा विश्वास झनझने यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

    बंडखोरांची गाठ शिवसैनिकांशी

    सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी पिसाटलेलं सध्याचं राजकारण आणि लोकशाहीच्या झालेल्या चिंध्या पाहून इतिहास देखील लाजला असेल. हे सर्व पाहुन असंच वाटतंय की शिवसेनेनं सर्व काही दिलेल्या एकनाथ शिंदेना पहायला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेच हवे होते. पण भाजप आणि बंडखोर आमदारांनी लक्षात ठेवावं, तुमची गाठ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांशी आहे, असा इशाराही प्रदीप झनझने यांनी दिला आहे.