mira bhayander corporation meeting

मीरा भाईंदर महानगरपालिकेची (Mira Bhayander Corporation) सर्वसाधारण महासभा सोमवारी भरवण्यात भरवण्यात आली होती. सभागृहात महत्वाचे विषय सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीतून दुपारी तीनच्या सुमारास प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास निकम (Shrinivas Nikam) यांनी सभागृहात प्रवेश केला. निकम यांनी सभागृहात घुसून थेट महापौरांजवळ जाऊन गोंधळ घातला.

    मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिकेची (Mira Bhayander Corporation) महासभा सुरु असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये पाणी व चहा न मिळाल्यामुळे थेट महासभा सुरू असताना सभागृहात प्रवेश करून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास निकम (Shrinivas Nikam) यांनी गोंधळ घातला. महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार त्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र जोपर्यंत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत सभागृह सुरू होणार नाही, अशी माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे (Jyotsna Hasnale) यांनी दिली आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा सोमवारी भरवण्यात भरवण्यात आली होती. सभागृहात महत्वाचे विषय सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीतून दुपारी तीनच्या सुमारास प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास निकम यांनी सभागृहात प्रवेश केला. निकम यांनी सभागृहात घुसून थेट महापौरांजवळ जाऊन गोंधळ घातला.अचानक सभागृहात आल्याने सर्व सदस्य गोंधळून गेले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निकम यांना सभागृहाबाहेर काढण्याकरिता उपस्थित नगरसेवक व शिपाई हे पुढे सरसावले. त्यानंतर निकम यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सभागृहाबाहेर काढले.

    मात्र पालिका आयुक्तांनी या प्रकरणी शिपाई मधुकर पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परिणामी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक बलाच्या कर्मचाऱ्यांची ही जबाबदारी असताना त्यांच्यावर तसेच संबंधित सभागृहात घुसलेल्या प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांवर कारवाई न करता पालिकेचे शिपाई मधुकर पाटील यांना निलंबन हे चुकीचे असल्याचं उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी म्हटले.