इंडिया नाव असलेल्या नोटा पण बदलेल, मोदी हे बिनडोक आणि पगला; प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या घोषणेनंतर आता सर्व पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत लिहिले जाणार होते. याच्यावरील खर्चावरून प्रकाश आंबेडकरांनी जोरदार निशाणा साधला होता.

  नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे बिनडोक आणि पगला व्यक्ती आहेत. आता ‘इंडिया’ऐवजी भारत लिहिले जाणार. सगळी पुस्तके बदलणार, त्यासाठी 40 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पगला बाबा असतो तो चांगले कपडे काढतो आणि तसाच फिरतो. आपण म्हणतो जाऊ द्या तो पगला आहे, आहे तसा स्वीकारा. हा मोदी पण पगला आहे की नाही? अशा बोचऱ्या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

  ….तर देशाची तिजोरी वाचेल

  मोदींना जेवढे लवकर सत्तेवरून खाली खेचाल तेवढी देशाची तिजोरी वाचेल अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने (Vanchit Bahujan Aghadi) नाशिकमध्ये आदिवासी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली.

  आपल्या अधिकाराची, हक्काची जाणीव

  प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आदिवासींच्या मोर्चामुळे आदिवासींना आपल्या अधिकाराची, हक्काची जाणीव झाली. आता आपली जबाबदारी आहे की आपण सगळे एकत्र आले आहोत. भिल्ल, कोकणा, वंचित, एससी वेगळा लढणार नाही. एकत्र लढून देशाची सत्ता हातात घेऊ, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. आदिवासींना धनगरांविरोधात आणि ओबीसींना मराठा विरोधात करायला सुरुवात झाली आहे. हे षडयंत्र केंद्रातील आणि राज्यांतील सरकार करत असून हे भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार आहे विसरू नका, असेही आंबेडकर यांनी म्हटले. मार्च किंवा एप्रिल अगोदर लोकसभा निवडणुका होतील असा अंदाज त्यांनी वर्तवला. उद्या कोण निवडून येतील यापेक्षा मोदी, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येणार नाही ही खूणगाठ आपण बांधली पाहिजे असेही आंबेडकर यांनी म्हटले.

  मणिपूरमध्ये आदिवासी ख्रिश्ननांवर हल्ला

  काल मुस्लिम आणि आदिवासी-ख्रिश्नचन लक्ष्य, उद्या कोणावर हल्ले?
  आज काँग्रेसची वर्किंग कमिटी जेलमध्ये आहे. हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. आताची लढाई जनतेची आहे. जनतेला शांतता पाहिजे की दंगल? असा प्रश्नदेखील त्यांनी केला. गोध्रा, मणिपूर जळाले. गोध्रात मुसलमान आणि मणिपूरमध्ये आदिवासी ख्रिश्ननांवर हल्ला झाला. उद्या तुमच्या आमच्यावर प्रयोग होणार असल्याची भीती आंबेडकरांनी व्यक्त केली.

  मोदी बिनडोक व्यक्ती…
  इस्त्रायल-हमास युद्धात तिकडे मिसाईलचा हल्ला पॅलेस्टाईनमध्ये होत आहे. इस्त्रायलच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पण इस्रायलला पाठिंबा कोणी दिला तर नरेंद मोदींनी. हे बिनडोक आहे, त्याचा नमुना डोक्यात ठेवायचा आहे
  तो बिनडोक आहे. पंतप्रधान इस्रायलला पाठिंबा देतात तर त्यांचा अधिकारी पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याची भूमिका सांगतो, याकडे प्रकाश आंबेडकरांनी लक्ष वेधले.

  बायडन मोदीला वाचवण्याचा प्रयत्न करताहेत
  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा किस्साही आंबेडकर यांनी सांगितला. जो बायडन काहीतरी सांगतात आणि मोदी हसत असल्याचे आपण पाहिले असेल. बायडन मोदीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदीने उजव्या हातात त्याचा ग्लास धरला त्यात लाल रंगाचे पाणी होते. बायडन लाल म्हणजे काय ते माहिती नव्हते, उजव्या नाही तर डाव्या हातात धरायचे आहे हे सांगायचे होते. लोकं समजतील तू दारू पितो आहे म्हणून ग्लास दुसऱ्या हातात घे असे बायडनला सांगायचे होते. पण मोदी हसत होते. असा बिनडोक माणूस आपल्याला चालेल का? असा सवालही आंबेडकर यांनी केला. इथल्या सनातनांना सांगतो. भारताची छि छु होऊ देऊ नका, जगभरात नाव खराब होत असल्याचे त्यांनी म्हटले.