‘नवनीत राणा पुढील सहा महिन्यात जेलमध्ये असतील’; वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत खासदार नवनीत राणा या पुढील सहा महिन्यांमध्ये जेल मध्ये जातील असा धक्कादायक दावा केला आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

    अमरावती : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेत अनेकांवर टीका टिप्पणी केली. अमरावतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांच्यावर निशाणा साधला असून त्या पुढील सहा महिन्यांमध्ये जेल मध्ये जातील असा धक्कादायक दावा केला आहे. तसेच राज्यातील राजकारणावर भाष्य करताना काँग्रेस (Congress) राष्ट्रवादी (NCP) आम्हाला वेटींग वर ठेवत असून आमची भूमिका भाजप विरोधी आहे. तर काँग्रेसची भूमिका ही दुतोंडी असल्याचे मत प्रकाश आंबेडकरांनी मांडले. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

    अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरादार टीका केली. यावेळी आंबेडकर म्हणाले, “राणांचा अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये घुमजाव सुरू आहे कधी म्हणतात की, भाजप आणणारा पाठिंबा देईल कधी म्हणतात की राष्ट्रवादी आम्हाला पाठिंबा देईल. मात्र त्या मुलुंड कोर्टामध्ये का गिरट्या घालत आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यात खासदार नवनीत राणा या जेल मध्ये दिसतील.”असा धक्कादायक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे,

    प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला देखील भोंगळ कारभारामुळे धारेवर धरले आहे. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था असली तरी मनमानी पध्दतीने काम करत असून सरकारच्या इशाऱ्यावर चालत आहे असा घणाघात त्यांनी केला. पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, “निवडणूक जाहीर झाल्या की, त्या घेतल्या पाहिजेत. निवडणूक आयोग कायद्याने वागत नाही. आयोग निःपक्षपाती राहला पाहिजे. मुंबई हायकोर्टाने निवडणूक घ्यायचं असं सांगितलं तरी देखील निवडणूका घेत नाही. निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की, तुमची वागणूक जनेतेच्या विरोधात आहे. लोकांनी जर उठाव केला तर तुम्ही जबाबदार आहे. कारण जनता ही देशाची मालक आहेत”अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत.