
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या निमित्ताने शनिवारी (दि.20) आंबेडकर नाशिक दाैऱ्यावर आले हाेते. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बाेलताना त्यांनी पंतप्रधान माेदींवर टीका केली. आजकाल पक्ष बाजुला ठेवून व्यक्तिगत राजकारण सुरू आहे.
नाशिक – भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी वैदीक पध्दतीचे आहे. तर शिवसेनेचे हिंदुत्व हे संत परंपरेचे आहे. शिवसेनेचे हे हिंदुत्व रूजू नये म्हणूनच भाजपने सेनेसाेबत फारकत घेतल्याचा आराेप वंचित बहुजन आघाहीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी नाशिकमध्ये केला. त्याचबराेबर शिवसेनेशी आमचं नातं अजून जुळलेले नाही, फक्त एकमेकांवर लाइन मारण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान माेदींवर टीका
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या निमित्ताने शनिवारी (दि.20) आंबेडकर नाशिक दाैऱ्यावर आले हाेते. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बाेलताना त्यांनी पंतप्रधान माेदींवर टीका केली. आजकाल पक्ष बाजुला ठेवून व्यक्तिगत राजकारण सुरू आहे. याला आळा बसणे आवश्यक आहे. पंतप्रधान माेंदींच्या माध्यमातून देशात हुकुमशाहीला सुरूवात झाली असून आता लाेकांनीच ठरवायचे त्यांना हुकुमशाही स्विकारायची की लाेकशाही.
महापालिकेच्या प्रचाराला आलेल्या पंतप्रधान
नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी मेट्रोचे उद्घाटन दोन वेळा करणे म्हणजे त्यांची खुर्ची ग्रामपालिका पातळीवर आणण्याचा प्रकार असल्याची टीका आंबेडकर यांनी केली. महापालिकेच्या प्रचाराला आलेल्या पंतप्रधानांनी आपली गरिमा राखून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातच प्रचाराला यावे असे आपणास वाटते. मात्र प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असते अशी पुष्टीही त्यांनी जोडली.