
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) निवडणूक लढविणार असतील तर त्यांच्या प्रचाराला मी ठाण्यात नक्की जाणार, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) निवडणूक लढविणार असतील तर त्यांच्या प्रचाराला मी ठाण्यात नक्की जाणार, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही माझ्याविरोधात वरळीतून लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो, असे आव्हान दिले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुका ठाण्यातून लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर आम्ही युतीत असलो आणि आदित्य ठाण्याकडून उभे राहिले तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार, असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत आम्ही युतीत असलो आणि आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक जर ठाण्यातून लढवली तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी मी युतीधर्म पाळणार. मी पॉलिटिकली क्लिअर आहे.
एक सप्टेंबर रोजी वंचित आघाडीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी पत्र दिले. तसेच ईमेल देखील केला होता. पत्रात आम्हाला इंडिया आघाडीत सहभागी व्हायचे आहे, असे म्हटले होते. तसेच ज्या अटी असतील त्यासोबतच आम्ही बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, आजपर्यंत काँग्रेसकडून पत्राला कोणतेही उत्तर दिले नाही, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.