भाजपला १० शिवसेना करायच्यायत, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करण्याचे टाळत म्हटले की, सध्या सुरू असलेले राजकारण हे महाराष्ट्राची परंपरा नाही. एकनाथ शिंदेंना स्पेस द्यायचा नसेल, तर उद्धव ठाकरेंना पुढच्या सर्वच निवडणुका लढवाव्या लागतील. समझोत्याच्या राजकारणात न अडकता त्यांना हे करावे लागेल.

    अकोला – काँग्रेसने आतापर्यंत एका ‘आरपीआय’च्या १० ‘आरपीआय’ केल्या. भाजपलाही एका शिवसेनेच्या १० शिवसेना करायच्या आहेत. त्या होऊ द्यायच्या का नाहीत, हे उद्धव ठाकरे यांच्याच हातात आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांना स्पेस न देता त्यांना सर्व निवडणुका लढवाव्या लागतील, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते.

    अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य करण्याचे टाळत म्हटले की, सध्या सुरू असलेले राजकारण हे महाराष्ट्राची परंपरा नाही. एकनाथ शिंदेंना स्पेस द्यायचा नसेल, तर उद्धव ठाकरेंना पुढच्या सर्वच निवडणुका लढवाव्या लागतील. समझोत्याच्या राजकारणात न अडकता त्यांना हे करावे लागेल.

    सध्याच्या राजकीय नाट्याचे डायरेक्शन आणि स्क्रिप्ट रायटींग, कॅमेरामन भाजपच असल्याचे ते म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की प्रकाश आंबेडकरांना कोण स्क्रीप्ट लिहून देतं हे पहावं लागेल.
    प्रकाश आंबेडकर म्हणाले, हा कालखंड समझोत्याचा आहे. त्याला धरूनच मागच्या लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, ज्या ठिकाणी आपण पाच वेळा अधिक जागा पराभूत झालेल्या त्याच जागा आम्हाला द्या. दरम्यान आता असणारी परिस्थिती अशी आहे की, शिवसेना आणि भाजपाचे भांडण आहे.