
मुंबई : वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठविल्याच्या बातम्या सुत्रांच्या आधारे काही वृत्त वाहिन्यांनी चालवले आहे. या वृत्तावर वंचित बहुजन आघाडी पक्षाची प्रतिक्रिया आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर म्हणाल्या की, वंचित बहुजन
इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी आमंत्रण
आघाडीला इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी आमंत्रण देण्यात आल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर चालविण्यात येत आहेत. मात्र आम्हाला अद्याप काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलाही पत्रव्यवहार किंवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही.
राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांच्या स्पष्टीकरण
दरम्यान, आमची विनंती आहे की, सूत्रांच्या किंवा राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांच्या हवाल्याने या बातम्या देण्यापूर्वी वृत्तवाहिन्यांनी त्या सूत्रांना किंवा बड्या नेत्यांना कॅमेरासमोर माहिती देण्यास सांगावे आणि मग बातम्या दाखवाव्यात, असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.