ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंना ब्लड कॅन्सर; पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरू

प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरसोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या १० दिवसांपासून खूप ताप आहे. पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाहते तसेच लोकांनी फोन करून डिस्टर्ब न करण्याची विनंती मुलगा अनिकेत व कुटुंबीयांनी केली आहे.

    पुणे – ज्येष्ठ समाजसेवक समाज सेवक प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरसोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या १० दिवसांपासून खूप ताप आहे. पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाहते तसेच लोकांनी फोन करून डिस्टर्ब न करण्याची विनंती मुलगा अनिकेत व कुटुंबीयांनी केली आहे. सध्या त्यांच्यावर न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. येत्या २ किंवा 3 आठवड्यांनंतर, शरीराची ताकद वाढल्यानंतर रक्त कर्करोगाचा उपचार सुरू होऊ शकतो.