prakash nikam

रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) मोखाडा येथील महाविद्यालयाच्या विकास समितीच्या सदस्य पदी पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश निकम (Prakash Nikam) यांची निवड करण्यात आली आहे.

    जव्हार: महाराष्ट्र राज्याच्या तळागाळात जाऊन शिक्षण देण्याचे काम अविरत करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) मोखाडा येथील महाविद्यालयाच्या विकास समितीच्या सदस्यपदी पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश निकम (Prakash Nikam) यांची संस्थेच्या वतीने निवड करण्यात आली आहे.

    प्रकाश निकम हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी असून त्यांनी मोखाडा (Mokhada) पंचायत समितीचे सभापती, पालघर जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे अनेक मानाची पदे भूषवली आहेत. सामाजिक कार्य करताना निकम यांनी शालेय प्रवेशापासून, रोजगार व्यवस्था,आरोग्य व्यवस्था यातील अन्यायावर मात करण्यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत. एकंदरीत त्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्यात त्यांना ओळखले जाते, असे काही शेतकरी, पुरुष व महिला बचत गटांनी सांगितले आहे.

    प्रकाश निकम यांच्या या निवडीमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रकाश निकम यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेने मला मोखाडा येथील महाविद्यालयाच्या समितीसाठी निवडले असल्याने माझ्या जबाबदारीत आता आणखी वाढ झाली असून सन २०२२ ते २०२७ पर्यंत माझ्या हातून मी या महाविद्यालयासाठी माझ्या परीने भरभराट आणि प्रगतीसाठी प्रयत्न करीन.