प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ, पोलिसांनी नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश

मुंबई बँक मजूर घोटाळ्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान दरेकरांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली असून,  चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दरेकरांना देण्यात आले आहेत. त्यामुळं दरेकरांवर अटकेची टांगती तलवार असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबै बँक निवडणुकीमध्ये मजूर म्हणून दरेकरांनी निवडणूक लढवली होती. यावर आक्षेप घेण्यात आला होता. दरम्यान दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरेकरांना उच्च न्यायालयाने या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

    मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कुरुघोडीचे राजकारण सुरु आहे. तसेच आरोप प्रत्यारोपसह ऐकमेकांचे घोटाळे बाहेर काढण्यात सध्या राजकारणी धन्यता मानत आहेत. मुंबई बँक मजूर घोटाळ्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान दरेकरांना पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली असून,  चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दरेकरांना देण्यात आले आहेत. त्यामुळं दरेकरांवर अटकेची टांगती तलवार असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबै बँक निवडणुकीमध्ये मजूर म्हणून दरेकरांनी निवडणूक लढवली होती. यावर आक्षेप घेण्यात आला होता. दरम्यान दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरेकरांना उच्च न्यायालयाने या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

    दरम्यान, भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. आता माता रमाबाई पोलीस ठाण्यातून नोटीस पाठवण्यात आली आहे. बोगस मजूर प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यानंतर दरेकरांनी न्यायालयात धाव घेतली होती. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने दरेकरांच्या बोगस मजूर प्रकरणात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतरच दरेकरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. प्रवीण दरेकर यांची या पूर्वीसुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ३ तास दरेकरांची चौकशी करण्यात आली होती.

    मुंबई बँक बोगस मजूर प्रकरण आम आदमी पार्टीने लावून धरले आहे. दरेकरांविरोधात आपचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदेंनी आधी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान मागील चौकशीवेळी त्यांचा फोनसुद्धा पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता. तसेच पोलिसांवर चौकशीदरम्यान दबाव होता असा आरोप दरेकरांनी केला होता. पुन्हा चौकशीला बोलवल्यास हजर राहणार असल्याचे दरेकरांनी सांगितले होते. तसेच आता पोलिसांना त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले असल्यामुळं दरेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.