धक्क्यांवर धक्के; मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड

सहा महिन्यांपूर्वी दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने ही मुंबै बँक ताब्यात घेतली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार येताच पुन्हा सत्तांतर झाले आहे. त्यामुळे या नव्या सरकारचा फायदा प्रवीण दरेकरांना झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    मुंबई : मुंबै बँकेच्या (Mumbai Bank) अध्यक्षपदी भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची बिनविरोध निवड (Unopposed Elected) झाली आहे. तर, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) यांची निवड करण्यात आली आहे. नवे सरकार आल्यावर बँकेतही सत्तांतर झाले आहे.

    सहा महिन्यांपूर्वी दरेकर यांना धक्का देत महाविकास आघाडीने (MVA) ही मुंबै बँक ताब्यात घेतली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार येताच पुन्हा सत्तांतर झाले आहे. त्यामुळे या नव्या सरकारचा फायदा प्रवीण दरेकरांना झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    महाविकास आघाडीची सत्ता असतानाच मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांनी सूत्रे हलवत भाजपाला धक्का दिला होता. मात्र आता अवघ्या सहा महिन्यांतच दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.