pravin darekar photo

भाजप महाराष्ट्रात (Maharashtra BJP) दंगलीचे राजकारण करत असल्याच्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या टीकेवर भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पलटवार केला आहे. चंद्रकांत खैरे यांचे वय वाढले. पण त्यांची राजकीय अक्कल वाढली नाही. त्यामुळे ते भाजपवर बिनबुडाचे आरोप करत आहेत.

    मुंबई : भाजप महाराष्ट्रात (Maharashtra BJP) दंगलीचे राजकारण करत असल्याच्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या टीकेवर भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पलटवार केला आहे. चंद्रकांत खैरे यांचे वय वाढले. पण त्यांची राजकीय अक्कल वाढली नाही. त्यामुळे ते भाजपवर बिनबुडाचे आरोप करत आहेत.

    शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपावर महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा आरोप केला होता. भाजप महाराष्ट्रात दंगलीचे राजकारण करत आहे. यापूर्वी राज्यात 7 दंगली झाल्या. हे सर्व भाजपचे कारस्थान होते. मुस्लिम व दलित मतदार उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या मागे उभे राहू नये, म्हणून भाजप त्यांना भडकावण्याचे काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

    त्यानंतर दरेकर यांनी खैरे यांच्या विधानावरून पलटवार केला. त्यांनी म्हटले की, ‘तुम्हीच दंगली घडवून जिंकले. चंद्रकांत खैरे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी दंगली घडवल्या. मारझोड, हाणामारीही केली. त्यांच्यात कोणतीही नैतिकता नाही. संभाजीनगरच्या प्रत्येक निवडणूक त्यांनी दंगली घडवून जिंकली. त्यामुळे त्यांनी नाकाने कांदे सोलण्याचे काम करू नये’, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.