राज्यपालांनी शाळांच्या वेळांबाबत केलेल्या सूचनेवर सरकारकडून मोठे संकेत; आता प्राथमिक शाळा…

राज्यातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांचे सकाळचे सत्र 9 वाजल्यानंतरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. तसेच शाळेची वेळ येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    नागपूर : राज्यातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांचे सकाळचे सत्र 9 वाजल्यानंतरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. तसेच शाळेची वेळ येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर एक समिती स्थापन केल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

    या समितीत मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञ यांचा समावेश असून याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा निर्णय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल, असेही स्पष्ट केले. लहान मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने त्यांच्या मेंदूमध्ये सिक्रेशन असते. त्याच्यावर परिणाम होतो आणि मुलांच्या मेंदूची वाढ खुंटते. त्यामुळे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेची वेळ कोणत्याही परिस्थितीत नऊच्या आधी असू नये, असे मत केसरकर यांनी व्यक्त केले.

    दरम्यान, हा निर्णय निर्णय नर्सरी, ज्युनियर केजी, सीनिअर केजी, इयत्ता पहिली आणि दुसरी यांच्यासाठी तसेच सरकारी आणि खासगी शाळांनाही लागू असेल, असे ते म्हणाले. यापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी सकाळचे शाळांचे सत्र उशिरा सुरू करावे, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता हा निर्णय घेतला जात आहे.