इस्लामपुरात रंगणार प्रीमियर क्रिकेट लीग ; सामन्यात १९९०च्या दशकातील खेळाडूंचा सहभाग

इस्लामपूर शहरातील पोलीस कवायत मैदानावर ही स्पर्धा हाेणार अाहे. स्पर्धेत नऊ संघ साखळी पद्धतीने खेळतील. आठ षटकांचे सामने होतील. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेटकीपर, सर्वोत्कृष्ट झेल अशी वैयक्तिक स्वरूपातील पारितोषिके दिले जाणार आहेत.

    इस्लामपूर : इस्लामपूर क्रिकेट असोसिएशनतर्फे ४० वर्षांवरील इस्लामपूर प्रीमियर टेनिस बॉल क्रिकेट लिग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. १९९० च्या दशकातील इस्लामपूर शहरातील खेळाडू या क्रिकेट लीगमध्ये खेळतील. विजेते पहिले चार संघ चषकाचे मानकरी असतील. सोळा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. इस्लामपूर शहरात सध्या क्रिकेटच्या मैदानावर मुले खेळताना दिसत नाहीत. मैदानी खेळाचे महत्व वाढवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
    इस्लामपूर शहरातील पोलीस कवायत मैदानावर ही स्पर्धा हाेणार अाहे. स्पर्धेत नऊ संघ साखळी पद्धतीने खेळतील. आठ षटकांचे सामने होतील. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेटकीपर, सर्वोत्कृष्ट झेल अशी वैयक्तिक स्वरूपातील पारितोषिके दिले जाणार आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इस्लामपूर क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू प्रयत्न करीत आहेत. १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल.

    भारतीय क्रिकेटपटूच्या नावाने संघ
    भारतीय क्रिकेटपटूच्या नावाने विविध संघ स्पर्धेत खेळतील. कपिल देव, सुनील गावस्कर,यशपाल, संदीप पाटील, किरमानी, श्रीकांत, रवी शास्त्री, अमरनाथ इलेव्हन या संघातून इस्लामपूर शहरातील ४० वर्षे पूर्ण झालेले खेळाडू असतील. नव्वदच्या दशकात शहरात विविध टीम क्रिकेट खेळत होत्या. या सर्व संघातील खेळाडू विविध संघात विभागले गेले आहेत. नऊ संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील. नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद वाढावा म्हणून पोलिसांचा संघ स्पर्धेत खेळेल.