राष्ट्रपतींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समज द्यावी किंवा महाराष्ट्राबाहेर बदली करावी – महेश तपासे

राज्यपाल अशी वादग्रस्त विधान करत असल्याने सामाजिक समीकरण बिघडत आहेच शिवाय ते जनतेचा रोष ओढावून घेत आहे. मात्र राज्यपालांनी तसे करु नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.

  • महेश तपासे यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र

मुंबई : राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) वादग्रस्त वक्तव्याने (Controversial Statement) राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत असून त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली (Transfer Outside Of Maharashtra) करावी किंवा समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (State Chief Spokesperson of NCP Mahesh Tapase) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे (By letter to President Draupadi Murmu).

भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे व राज्यसरकारला वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे परंतु दुर्दैवाने राज्याचे राज्यपाल नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

राज्यपाल अशी वादग्रस्त विधान करत असल्याने सामाजिक समीकरण बिघडत आहेच शिवाय ते जनतेचा रोष ओढावून घेत आहे. मात्र राज्यपालांनी तसे करु नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.

दरम्यान राज्यपालांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी अशी विनंती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेल्या पत्रात महेश तपासे यांनी केली आहे.