Incident that tarnishes relationship, abuse of minor girl by maternal uncle

देशभरात श्रध्दा प्रकरण गाजत असतांना हिंगोली जिल्हयात एक तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केला तसेच धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे.

    हिंगोली – जिल्हयातील रेडगाव येथे तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून फुस लाऊन पळवून नेले. त्यानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे शपथपत्र तयार केले. मात्र काही दिवसांतच धर्मांतरासाठी दबाव आणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून साजीद रफीकखाँ पठाण (रा. जवळा पांचाळ) या तरुणाविरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १८) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

    देशभरात श्रध्दा प्रकरण गाजत असतांना हिंगोली जिल्हयात एक तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन अत्याचार केला तसेच धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला आहे.

    तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील एका २१ वर्षीय तरुणीला जवळापांचाळ येथील साजीद रफीकखाँ पठाण या तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून ८ जुलै २०२२ रोजी पळवून नेले. मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी नोंद घेऊन तिचा शोध सुरु केला होता.

    दरम्यान, साजीद पठाण याने त्या तरुणीला डोंगरकडा, जवळाबाजार, औरंगाबाद, फरिदाबाद (दिल्ली) येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर फरिदाबाद येथेच त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपचा बाँड तयार केला. सुमारे दोन महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात ते परत डोंगरकडा येथे येऊन राहू लागले. मात्र यावेळी साजीदकडून त्या तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव आणला लागला. मात्र त्या तरुणीने धर्मांतरासाठी विरोध केल्यानंतर तिला त्रास देऊन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे तरुणीने साजीदला सोडून देत घर गाठले. घडलेला प्रकार कुटुंबियांना सांंगितला. मात्र बदनामीच्या भितीने कुटुंबियांनी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र साजीदकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी शुक्रवारी ता. १८ रात्री आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

    यावरून पोलिसांनी साजीद खाँ पठाण याच्या विरुध्द अत्याचार व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, उपाधिक्षक किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोेलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार शेख बाबर यांच्या पथकाने तातडीने साजीद यास रात्रीच ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.