पंतप्रधान आवास योजनेचा निधी, मिळणार तर कधी?

संपूर्ण देशात मोठा गाजावाजा करुन केंद्र शासनाने सर्वच राज्यात पंतप्रधान आवास योजना राबवली खरी पण त्यासाठी जाहीर केलेला निधीच अद्याप कोणत्याही राज्याला अथवा कोणत्याही लाभार्थ्याला दिला नसल्याने आवास योजनेचे घरकुल पुर्ण होवुनही आज राज्यातील सर्वच लाभार्थी निधीची वाट पहात निधी मिळणार तर कधी असा प्रश्न विचारत आहेत.

  म्हसवड  : संपूर्ण देशात मोठा गाजावाजा करुन केंद्र शासनाने सर्वच राज्यात पंतप्रधान आवास योजना राबवली खरी पण त्यासाठी जाहीर केलेला निधीच अद्याप कोणत्याही राज्याला अथवा कोणत्याही लाभार्थ्याला दिला नसल्याने आवास योजनेचे घरकुल पुर्ण होवुनही आज राज्यातील सर्वच लाभार्थी निधीची वाट पहात निधी मिळणार तर कधी असा प्रश्न विचारत आहेत.

  केंद्र शासनाने देशभरातील सर्वसामान्य जनतेला स्वत:च्या हक्काचे घर असावे या प्रांजळ भावनेतुन राज्य सरकारच्या मदतीने सर्वच राज्यात पंतप्रधान आवास योजना राबवण्याचे अद्यादेश काढले या अद्यादेशानुसार पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी केंद्र शासनाकडुन दिड लाख रुपये अनुदान दिले जाणार तर राज्य शासनाकडुन १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात येतील असे जाहीर करण्यात आले, त्यामध्ये केंद्र सरकार कडुन मिळणारे दीड लाख रुपयांचे अनुदान हे संबधित लाभार्यांना तीन टप्प्यात देण्याचे जाहीर करण्यात आले होते पहिला व दुसरा टप्पा हा प्रत्येकी ६० हजार रुपयांचा तर तीसरा हप्ता हा ३० हजार रुपयांचा दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर राज्य शासनाकडुन याबाबत १ ऑगष्ट २०१९ ला एक अद्यादेश काढण्यात आला की यातील प्रत्येक लाभार्थ्याला तो पात्र ठरल्यावर १ लाख रुपये दिले जाणार, त्यामुळे सर्वसामान्य जनतेने मोठ्या उत्साहाने या योजनेत सहभाग नोंदवला सदर ची योजना ही राज्य शासनाने नगरपरिषदेमार्फत राज्यभर राबवण्यास सुरुवातही केली राज्यातील सर्वच नगरपरिषदांनीही याची मोठी जाहीरातबाजी करीत नागरीकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणेच म्हसवड नगरपरिषदेनेही म्हसवडकर नागरीकांना आवाहन करुन सदर योजनेत सहभागी करुन घेतले आहे, या शहरातील ९६ जण याचे लाभार्थी ठरले आहेत या लाभार्थ्यांनी आपल्या हक्काच्या घरासाठी थेट केंद्र व राज्य सरकार आपल्या पाठीशी असल्याचा आनंद व्यक्त करीत मोठ्या उत्साहात आपल्या घर बांधणीचा शुभारंभ केला मात्र घरासाठी मिळणारे अनुदान हे टप्प्या टप्प्याने येणार असल्याने अनेकांनी यासाठी आज ना उद्या अनुदान नक्की येणार असल्याची खात्री करुन कर्जे काढली अन् आपली घरे उभारली. म्हसवड शहरात पात्र ठरलेल्या ९६ लाभार्यांपैकी ४३ जणांनी आपले घरकुल पुर्ण केले आहे तर ५३ जणांची कामे सुरु असुन लवकरच ती पुर्ण होतील, यामध्ये ९६ पैकी ८९ जणांना राज्य शासनाकडुन मिळणारे १ लाख रुपयाचे अनुदान मिळाले आहे, तर अवघ्या ४२ लाभार्थ्यांना केंद्र सरकार कडुन अनुदानाचा पहिला हप्ता म्हणजे अवघे ६० हजार रुपये मिळाले आहेत. हीच परिस्थिती संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक नगरपरिषदांमधील प्रत्येक लाभार्थ्यांच्या बाबतीत आहे असे खात्रीशिर वृत्त आहे. अनुदान मिळण्याच्या आशेवर अनेक पात्र लाभार्थ्यांनी आपल्या हक्काच्या घरकुलासाठी कर्ज प्रकरणे करुन घरकुले उभारली आहेत मात्र अनुदानाचे हप्ते रखडल्याने त्यासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करावयाची याची चिंता आता या सर्वच लाभार्थ्यांना वाटत आहे.

  अनुदानासाठी लाभार्थ्यांचे पालिकेत खेटे –
  जे नागरीक यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यांनी आपल्या हक्काच्या निधीसाठी पालिकेत दररोज खेटे मारण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे, तर पालिकेकडुन अद्याप अनुदान आले नसल्याची एकच टेप त्यांच्यासमोर नेहमीच वाजवली जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

  घरकुल पुर्ण झाल्याचे फोटो पोर्टलवर-
  अनुदानासाठी जे लाभार्थी पालिकेत हेलपाटे मारीत आहेत, अशा लाभार्थ्यांनी आपले घरकुल पुर्ण झाल्याचे फोटो ही पालिकेत दिले आहेत, पालिकेनेही संबधित लाभार्थ्यांच्या पुर्ण झालेल्या घरकुलांचे फोटो केंद्र सरकार च्या पोर्टवर अपलोड केल्याची माहिती समोर येत आहे, मात्र फोटो अपलोड करुनही अद्याप लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थ्यांचा टाहो सुरु आहे.

  घरकुलाचा वापर जाहीरातीसाठी होणार –
  आगामी काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, याकाळात केंद्र व राज्य सरकार कडुन घरकुलांची मोठी जाहीरात बाजी निश्चितच केली जाईल यात शंका नाही, तुम्ही खुशाल जाहीरातबाजी करा पण आम्हाला आमचे अनुदान द्या एवढीच अपेक्षा लाभार्थी करीत आहेत.