पंतप्रधान मोदींनी देशाचे फसवणूक केली ; विद्या चव्हाण यांचा घणाघाती आरोप

सध्या जनता महागाईनी होरपळत आहे. गॅस पेट्रोल डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. कुठे आहेत अच्छे दिन, असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची फसवणूक केली, अशी घणाघाती टीका  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली.

    मंचर : सध्या जनता महागाईनी होरपळत आहे. गॅस पेट्रोल डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. कुठे आहेत अच्छे दिन, असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची फसवणूक केली, अशी घणाघाती टीका  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली.  वाढती महागाई आणि  राज्यपालांचे  आक्षेपार्ह विधान  या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी येत्या ९ ऑगस्टला राज्यपालांच्या पुण्यातील निवास्थानी   राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा,  असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

    मंचर (ता. आंबेगाव )सहकारी बँकेच्या सभागृहात तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित महिला पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत  चव्हाण बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, प्रदेश निरिक्षक आशा  मिरगे, लोचन शिवले,  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  तालुका अध्यक्षा सुषमा  शिंदे, अरूणा थोरात, वैशाली बेंडे,  पुष्पा जाधव,  उषा कानडे, सविंद्रा काळे, ज्योती निघोट, सविता सैद, शहानुर शेख, अनिता भालेराव, उज्वला गावडे, वेणु खरमाळे, उर्मिला  धुमाळ, उर्मिला वळसे, माणिक गावडे, प्रज्ञा कुलकर्णी, सिताबाई चासकर, ज्योती घोडेकर आदी  उपस्थित होत्या.

    राजभवनासमोर ‘राज्यपाल गो बॅक’ आंदोलन
    चव्हाण पुढे म्हणाल्या,  राज्याचे राज्यपाल आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना एकेरी बोलतात. तसेच वारंवार चुका करतात. मराठी माणसाला कमी लेखतात. या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी राज्यपालांच्या पुणे येथील निवासस्थानी ९ ऑगस्टला राज्यपाल गो बॅक आंदोलन करण्यात येणार आहे.  पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावात छोटे छोटे मोर्चे, बैठका, आंदोलने करून भाजपा पक्षाच्या विरोधात समाजात जनजागृती करायला आतापासूनच करायला हवी आहे. यावेळी प्रत्येक महिला पदाधिकार्‍याशी चव्हाण यांनी संवाद साधला. प्रास्ताविक सुषमा  शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अक्षदा शिंदे यांनी केले.