पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र दौरा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह येणार एकाच मंचावर

मुंबईत जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

    मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) एकाच मंचावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. (Prime Minister Narendra Modi on a Visit of Maharashtra) देहूतील श्रीसंत तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर ते मुंबईत येणार आहेत. यावेळी राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीचं उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याने मोदी आणि ठाकरे एकत्र येणार आहेत.

    नरेंद्र मोदी दुपारी पावणे दोन वाजता देहूत दाखल होणार असून, मंदिराबाहेर 400 वारकऱ्यांकडून टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत करणार आहेत. देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईतही मोदींचा आज दौरा आहे. मुंबईत जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

    देहू, पुणे येथील जगतगुरू श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. संत तुकाराम हे एक वारकरी संत आणि कवी होते. जे कीर्तन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आध्यात्मिक गीतांद्वारे अभंग भक्ती काव्य आणि समाजाभिमुख उपासनेसाठी प्रसिद्ध होते. ते देहू येथे राहत होते. त्यांच्या निधनानंतर शिला मंदिर बांधले गेले. 36 शिखरांसह ते दगडी दगडी बांधकामात पुन्हा बांधले गेले आहे आणि त्यात संत तुकारामांची मूर्ती देखील आहे.