
या मेट्रो मार्गिकेमुळे दहिसर ते अंधेरी प्रवास सुकर आणि अतिजलद होणार आहे. पण त्याहीपेक्षा म्हत्त्वाचे म्हणजे मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ अशा तीन मार्गिका एकमेकांशी जोडल्या जाणार असल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवास करणे शक्य होणार आहे.
मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Indian Prime Minister Narendra Modi) यांनी आज मुंबईत ३८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. मोदींच्या हस्ते मेट्रो २ अ, मेट्रो ७, (Metro 2 A, Metro 7) ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ४०० किमी काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांचं भूमीपूजन तसेच विविध प्रकारच्या विकासकामांचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. यावेळी मोदींनी भाषण करत मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढवला. त्यानंतर नरेंद्र मोदींनी गुंदवली-मोगरापाडा दरम्यान मेट्रोतून प्रवास केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुंदवली मेट्रो स्टेशनवर (Gundvali Metro Station) ‘मुंबई वन’ हे विशेष ॲप (Mumbai One Special App) सादर केले. मेट्रो तिकीट ऑनलाइन काढण्यासाठीचे हे विशेष ॲप आहे. यासह मेट्रो तिकीट काढण्यासाठी राष्ट्रीय समान वाहतूक कार्डदेखील नरेंद्र मोदींनी सादर केले. त्यानंतर पीएम मोदींनी गुंदवली मेट्रो स्टेशनची पाहणी केली आणि मुंबई मेट्रोमधूनही प्रवास केला.
लोकार्पणानंतर शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून मेट्रो २ अ आणि ७ मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे. मेट्रोने दहिसर ते अंधेरी प्रवास केवळ ३५ मिनिटात करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न अखेर यामुळे पूर्ण होणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी गुंदवली मेट्रो स्टेशनवरुन मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी उपस्थित होते. मोदींनी मेट्रोतून प्रवास करताना तरुणांसोबतच स्थानिकांशीही संवाद साधला.
या मेट्रो मार्गिकेमुळे दहिसर ते अंधेरी प्रवास सुकर आणि अतिजलद होणार आहे. पण त्याहीपेक्षा म्हत्त्वाचे म्हणजे मेट्रो १ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ अशा तीन मार्गिका एकमेकांशी जोडल्या जाणार असल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगर प्रवास करणे शक्य होणार आहे.
आता रेल्वे, बेस्टनंतर मेट्रोचे ही जाळे तयार होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.मेट्रो २ अ मधील दहिसर ते डहाणूकरवाडी आणि मेट्रो ७ मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) एप्रिल २०२२ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात झाला आहे.
PM Modi inaugurates two lines of Mumbai metro, other development projects
Read @ANI Story | https://t.co/MIkpl7pqT2#PMModi #MumbaiMetro #Mumbai pic.twitter.com/igcTGHgXkD
— ANI Digital (@ani_digital) January 19, 2023
११ डिसेंबर रोजी मोदींनी नागपूर दौरा केला होता. यावेळी नागपूर मेट्रो फेज 1 चे उद्घाटन आणि मेट्रो 2 च्या शिलान्यास कार्यक्रमाअंतर्गत नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधून प्रवास केला. यावेळी मोदींनी विद्यार्थी विद्यार्थिनींशी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्याआधी मोदींनी नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तिला रवाना केले. त्यानंतर त्यांनी झिरो माइल वर असणाऱ्या फ्रीडम पार्क येथे मेट्रोचे तिकीट काढले होते.
मुंबईचा कायापालट करणार
आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणं सुविधेचं होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांतून मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांचं अभिनंदन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.