नरेंद्र मोदींचा कारभार हुकूमशाहीच्या दिशेने; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केंद्रीय स्वायत्तता संस्थांचा मनमानी पद्धतीने सुरू आहे. त्यांची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली.

    विटा : गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केंद्रीय स्वायत्तता संस्थांचा मनमानी पद्धतीने सुरू आहे. त्यांची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली.

    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘मोदी सरकारच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करुन जातीय दंगल घडवून आणली जात आहे. मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढली गेली. त्याकडे मोदींनी ढुंकूनही पाहिलं नाही. मोदींच्या काळात बेरोजगारी, महागाईने कळस गाठला आहे. तरुण, शेतकरी देशोधडीला लागले आहेत. देशातील नऊ राज्यात सरकार हुकूमशाहीच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.

    खोटी स्वप्ने दाखवून जनतेची दिशाभूल केली

    आमदार डॉ . विश्वजीत कदम म्हणाले, ‘केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी खोटी स्वप्ने दाखवून जनतेची दिशाभूल केली.‌ दिलेली आश्वासनांची काय झाले याचा विचार करण्याची गरज आहे. जाती-जातीमध्ये धार्मिक तेढ निर्माण करुन सत्ता मिळवली आहे. त्यांना सत्तेतून पायउतार होण्याची गरज निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेतून सामान्य माणसं जोडली जात आहेत. देशातील नऊ राज्ये केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने पाडली’.