मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर समस्या; विरोधी पक्ष नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणक्यांचे आजारांचे प्रमाण वाढले आहेत. वाहतूक कोंडीमुळे शहरातून प्रदूषणात भर पडत आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत, असे अजित पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

    मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्र लिहिले आहे. पत्राद्वारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विशेष विनंती केली आहे. ज्येष्ठ नेते विनायक मेटे (Vinayak Mete Accident) यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अजितदादांनी पावसाळी अधिवेशनात (Rainy Session) राज्यातील रस्त्यांच्या बाबतीत विषय मांडला होता. यापैकी, मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Nashik National Highway) विविध समस्यांबाबत पत्र लिहीले आहे.

    पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर दररोज असा वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

    रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मणक्यांचे आजारांचे प्रमाण वाढले आहेत. वाहतूक कोंडीमुळे शहरातून प्रदूषणात भर पडत आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत, असे अजित पवार यांनी नमूद केले आहे.

    या परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करणे, पुलांचे अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करणे, अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर मार्ग काढणे यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी, वाहतूकदार संघटना, प्रवासी संघटना, स्थानिक नागरिक आदींना विश्वासात घेऊन वाहतुकीचे सुयोग्य आणि प्रभावी नियोजन करावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.