
पुण्यातील सुप्रसिद्ध सिम्बॉयसेस कॉलेजमधील एका प्राध्यापकाने हिंदू धर्मातील देवांबाबात विधान केल्यानं वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकवत असताना हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचं उदाहरण देत त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे.
पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध सिम्बॉयसेस कॉलेजमधील एका प्राध्यापकाने हिंदू धर्मातील देवांबाबात विधान केल्यानं वाद निर्माण झाला आहे. पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकवत असताना हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचं उदाहरण देत त्यांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर काही संतप्त हिंधू बांधवांनी प्राध्यापकांना गाठून त्यांना पोलीस ठाण्यात नेलं.
पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजमधील प्राध्यापकाचं हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह विधान pic.twitter.com/xOOjsW9Qk6
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) August 3, 2023
तिथे पोलिसांना हे संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि व्हिडीओ देखील दाखवला. मात्र 12 तास उलटून गेल्यानंतर प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला नाही. पुण्यात एका प्राध्यापकाने 12 वीच्या वर्गात शिकवताना हिंदू देवदेवतांसंबंधी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्थेनं केला आहे.याप्रकरणी संबंधित प्राध्यापकाला या हिंदु कार्यकर्त्यांनी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ काढत असल्याचा दावा हिंदू बांधव समाजिक संस्थेनं केला आहे.
पोलिसांनी तुर्तास त्या प्राध्यापकाला सोडून दिलं पण चौकशीअंती योग्य ती कारवाई करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान हे प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच संबंधित शिक्षण संस्थेनं वादग्रस्त विधान करणाऱ्या प्राध्यापकाला कामावरून काढून टाकलं आहे.