Professors murder smacks of immoral relationship strangulation by wife and lover

दिग्रस - पुसद रस्त्यावरील सिंगद येथील पुलाखाली सोमवारी १ ऑगस्ट सायंकाळी एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या हातावर सचिन नाव गोंदलेले आढळून आले होते, पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या अवाहनानंतर सदर इसम हा उमरखेड येथील सचिन वसंतराव देशमुख असल्याचे उघडकीस आले. मृतक सचिन हा त्याच्या पत्नीकडे आकोट येथे गेला होता.

    दिग्रस : तालुक्यातील सिंगद (Singad in Taluka ) येथील पुलाखाली एक मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दिग्रस पोलिसांनी (Digras Police) यवतमाळ (Yavatmal) येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अहवालात काही बाबींवर संशय आल्याने सदर प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तसेच मृतकाचे चुलत भाऊ हर्षद नागोराव देशमुख यांनी घातपात झाल्याची तक्रार दिली होती. यात पत्नी व तिच्या प्रियकराचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी दिली.

    दिग्रस – पुसद रस्त्यावरील (Digras – Pusad road) सिंगद येथील पुलाखाली सोमवारी १ ऑगस्ट सायंकाळी एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या हातावर सचिन नाव गोंदलेले आढळून आले होते, पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. पोलिसांच्या अवाहनानंतर सदर इसम हा उमरखेड येथील सचिन वसंतराव देशमुख असल्याचे उघडकीस आले. मृतक सचिन हा त्याच्या पत्नीकडे आकोट येथे गेला होता, त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह सिंगद येथे पुलाखाली (Body under bridge at Singad) आढळून आला. पोलिसांना या मृतदेहाबाबत संशय येत असल्याने त्यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह यवतमाळ येथे पाठविला. त्यानंतर दिग्रस पोलिसांना प्राप्त वैद्यकीय अहवालात संशयित बाबी आढळून आल्याने दिग्रस पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

    या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास घट्टे, उपनिरीक्षक विशाल बोरकर, सुजित जाधव करीत आहे. आकोट येथून पत्नीला भेटून निघाल्यानंतर सचिनचा मृतदेह सिंगद येथे कसा आला याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अधिक खोलवर तपास पोलिसांकडून करण्यात आला. तेव्हा अनैतिक संबंधातून हा गळा दाबून खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

    या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार धर्मा सोनुने यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभाग (Criminal Investigation Department) परदेसी, सायबर टीम व उमरखेड येथील पोलीस निरीक्षक माळवे (Police Inspector Malwe) व त्यांचे सहकारी यांनी सखोल चौकशी केली या प्राथमिक चौकशीत मृतकाची पत्नी धनश्री सचिन देशमुख व तिचा प्रियकर शिवम चंदन बछले यांच्या सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. धनश्री सचिन देशमुख ही अकोट येथे वनरक्षक होती. तर तिचा प्रियकर शिवम चंदन बचले परतवाडा येथे वनरक्षक होता. तर पती सचिन देशमुख (रा. उमरखेड) हा प्राध्यापक होता. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.