अहमदनगर येथे होणाऱ्या सायक्लोथान प्रचार प्रसारसाठी शेवगाव येथे प्रोमो राईट उत्साहात

या रॅलीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे रॅलीत महिला सायकलस्वारांची उपस्थिती उल्लेखनीय होती. युटर्न पाँईट वर फोटो शुट करून साधारण साडेसात वाजता रॅलीने यु टर्न घेतला. रमत -गमत राईडचा आनंद घेत राई ड नियोजित ठिकाणी साडे आठच्या दरम्यान पोहोचली.

    शेवगाव : अहमदनगर येथे 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जागतिक स्तरावरील अहमदनगर सायक्लोथान राइटच्या प्रचार व प्रसार साठी शेवगाव ते साकेगाव राइट२२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता शेकडो सायकल स्वारांच्या साथीने अहमदनगर सायकल क्लब चे चंद्रशेखर मुळे यांच्या उपास्थितीत शेवगाव क्लब चे डॉ. भागीनाथ काटे , डॉ. संजय लड्डा , सेवानिवृत्त शिक्षक वसंत सुरवसे, यांनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुजा करून पुष्पहार अर्पण केला . त्यावेळी उपस्थित सायकल स्वारांच्या भारत माता व छात्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमला. डॉ. योगेश फुंदे , डॉ.दिपक वैद्य, डॉ.श्रीकांत देवढे यांनी झेंडा फडकावताच रॅलीला सुरुवात झाली. साखर झोपेत असलेले शेवगावकर जयघोषांच्या आवाजाने जागे होवून डोळे चोळत राईड पाहण्यासाठी घरा बाहेर आले.

    रॅली क्रांती चौक, आंबेडकर चौक, संत गाडेग बाबा चौक मार्गे साकेगाव कडे निघाली. रस्त्याने एवढी भव्यदिव्य रॅली शिस्तीत जात असताना वाटसरु कौतुकाने रॅली कडे पाहत होते. रस्त्यात सायकल स्वार थोर पुरुषांच्या व भारतमातेच्या नामांचा जयघोष करीत असल्यामुळे रॅलीला एक वेगळाच रंग आला होता . रॅलीला साकेगाव यु टर्न घेणार होती . त्या युटर्न पाँईट वर पाणी , चक्की , एनर्जी उत्तेजक पेय ठेवण्यात आली होती.

    या रॅलीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे रॅलीत महिला सायकलस्वारांची उपस्थिती उल्लेखनीय होती. युटर्न पाँईट वर फोटो शुट करून साधारण साडेसात वाजता रॅलीने यु टर्न घेतला. रमत -गमत राईडचा आनंद घेत राई ड नियोजित ठिकाणी साडे आठच्या दरम्यान पोहोचली.

    प्रथम सर्व सहभागी सायकल स्वारांना टी शर्ट चे वाटप करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली . अध्यक्ष विनोद ठाणगे यांनी शेवगाव सायकलचा इतिहास त्यांच्या शैलीत सांगितला. डॉ. संदिप बोडखे यांनीं सायकल क्लब च्या पुढील वाटचालीबाबत सविस्तर माहिती विशद केली . अहमदनगर सायकल असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, रवींद्र पत्रे अहमदनगर सायकलिस्ट प्रवक्ते, रवींद्र दरेकर अ.नगर सायकलिस्टचे सी.ए.यांचा शेवगाव सायकल कल्बच्या वतीने सत्कार करण्यात आला.

    तसेच शेवगाव क्लब च्या ज्या सायकलपटूंनी नुकताच S. R हा बहुमानाचा किताब पटकावला त्यांचा अहमदनगर सायकल कल्बच्या वतीने सत्कार करण्यात आला . या सत्कार मुर्तीत डॉ. स्मिता उगले ( ज्या अहमद नगर जिल्ह्यातील प्रथम महिला S. R विजेत्या ठरल्या) ,डॉ . प्रदिप उगले, डॉ. मुकुंद दारकुंडे , निलकंठ लबडे, आबासाहेब नेमाने, संजय बडे ( हे . कॉ . ) , बंडू दहातोंडे आणि सुभाष पवार यांचा समावेश होता. तसेच शेवगाव शहरात गेल्या दहा वर्षापासून सायकल चालवत असलेले डॉ. मनिषा लड्डा व डॉ. संजय लड्डा यांचाही सत्कार करण्यात आला . हा कार्यक्रम अध्यक्ष विनोद ठाणगे यांच्या अध्यक्षते खाली आणि डॉ. संदिप बोडखे, संतोष भागवत,प्रा.राम नेवल, भारतदहिवाळकर, लक्ष्मण बिटाळ सर, दुर्गेश काथवटे, नितीन पवार, डॉ शिल्पा देहाडराय,वल्लभ लोहिया, प्रा.गजानन लोंढे, प्रा.मच्छिंद आधाट प्रशांत सुपेकर, विनोद शेळके मेजर, तुकाराम बुळे मेजर, प्रा.राम नेव्हल, प्रदिप बोडखे, डॉ.मयुर लांडे या सायकल कल्बच्या सदस्यांनी सहभाग घेतला… कैलास जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

    आभार सुनील गवळी यांनी मानले. या राईट चे नियोजन हरिष शिंदे, निलेश केवळ नानासाहेब देशपांडे, यशवंत तुपे सुरेश क्षिरसागर, दुर्गेश काथवटे यांनी केले.