घरपट्टी आकारणीतील त्रुटी तात्काळ दूर करा ; आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना

हद्द वाढीच्या भागात कॅम्प घेण्याचे दिले निर्देश

    सातारा : सातारा शहरातील मिळकतींच्या संदर्भात चुकीची घरपट्टी आकारणी झाली आहे . समान मिळकतींना वेगवेगळी घरपट्टी, भाडेकरूंच्या नोंदणी मिळकतपत्रावर नसताना भाडेकरी गृहीत धरून दरपट्टी आकारणे अशा अनेक त्रुटी निदर्शनास आल्या आहेत या संदर्भात सातारकरांनी वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत .या घरपट्टी आकारणीतील त्रुटी तत्काळ दूर कराव्यात व नागरिकांच्या सोयीसाठी हद्द वाढीच्या भागात तातडीने कॅम्प घेऊन तिथल्या तिथे त्या त्रुटी दुरुस्त करून घरपट्टी जमा करण्यात यावी अशा स्पष्ट सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना दिल्या

    आमदारांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांनी छ शिवाजी सभागृहात अक्षरशः तक्रारींचा पाऊस पाडला गेल्या पंधरा पासून सातारा पालिकेने चतुर्थ वार्षिक पाहणीच्या अपील प्रक्रियेला स्थगिती दिलेली असताना जुने घरपट्टी गृहीत धरून हद्द वाढीच्या भागांना 40 टक्के प्रमाणे घरपट्टीची बिले काढले आहेत . या रकमा काही हजारोच्या घरात असल्याने सर्वसामान्य सातारकर सुविधा नसल्यामुळे मेटाकुटीला आले आहेत . या रकमा कशा भरावयाच्या याविषयी गोंधळाचे वातावरण आहे या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी मुख्याधिकारी बापट यांची भेट पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात भेट घेतली . यावेळी माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, शेखर मोरे ,अविनाश कदम,रवी पवार, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे स्वीय सहाय्यक अमर मोकाशी, पक्षप्रतोद, अमोल मोहिते अशोक मोने इत्यादी यावेळी उपस्थित होते

    मुख्याधिकारी बापट यांनी जुन्या घरपट्टी प्रमाणे चतुर्थ वार्षिक पाहणीला आधीन राहून ही बिले काढण्यात आली असून हद्दवाढीच्या भागातील नागरिकांनी देय रक्कमच अदा करावयाची आहे या संदर्भात जर काही त्रुटी असतील तर नागरिकांनी तात्काळ संपर्क साधून त्या त्रुटी दुरुस्त करून घ्यावा असे त्यांनी सांगितले मात्र आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले घरपट्टी आकरणाविषयी सातारा जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे .नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कर आकारणी करताना सदनिकांमधील जिने बाथरूम्स यांचा अंतर्भाव केला आहे,मोकळ्या जागांचाही समावेश घरपट्टीत झाल्यामुळे त्यांच्या रकमा वाढल्या आहेत, समान मिळकती समान बांधकामे यांना वेगवेगळ्या घरपट्टी आकारल्या गेल्या आहेत . हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांमध्ये घरपट्टी विषयी अजिबात प्रबोधन नाही मुख्याधिकाऱ्यांनी अधिकारी व दोन कर्मचारी तसेच घरपट्टी वसुलीची ऑनलाईन यंत्रणा घेऊन हद्दवाढीच्या भागात कॅम्प लावावेत व तेथेच घरपट्टी दुरुस्त करून ती वसूल करण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली

    यासंदर्भात मुख्याधिकारी बापट म्हणाले घरपट्टी ऑनलाईन भरण्यासाठी क्यूआर कोड विकसित करण्यात आला असून त्याचा उल्लेख घरपट्टीच्या बिलावर आहे नागरिक ऑनलाईन घरपट्टी दुरुस्त करू शकतात मात्र या संदर्भात नागरिकांना योग्य त्या सूचना देण्यात येत आहेत पुढील काही महिन्यात ही ऑनलाईन प्रणाली अध्यायावत करण्यात येईल मात्र आपल्या सूचनेप्रमाणे हद्दवाढीच्या भागात शाहूनगर पिरवाडी विलासपुर शाहूपुरी येथे या संदर्भात कॅम्प लावले जातील आणि दरपट्टीच्या बिलांमध्ये ज्या त्रुटी असेल त्या दुरुस्त केल्यातील असे सांगितले