अल्पवयीन मुलीला भररस्त्यात केलं प्रपोज; आजीने जाब विचारल्यामुळे तरुणांनी केली पाइपने मारहाण

प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने साथीदाराच्या मदतीने मुलीच्या आजीला पाइपने मारहाण केल्याची घटना खडकी परिसरात घडली. याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे.

    पुणे : प्रेमास नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने साथीदाराच्या मदतीने मुलीच्या आजीला पाइपने मारहाण केल्याची घटना खडकी परिसरात घडली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका तरुणास अटक करण्यात आली आहे.

    आरोपीचा साथीदार सागर नायर (वय २०, रा. महादेववाडी, खडकी बाजार) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि आरोपी सागर नायर मित्र आहेत. आरोपी १७ वर्षीय मुलगा मुलीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. मुलीने प्रेमास नकार दिल्याने तो तिच्यावर चिडला होता. अल्पवयीन मुलगा आणि साथीदार मुलीच्या घरात शिरले. त्यांनी मुलीला शिवीगाळ केली. आजीने जाब विचारल्याने अल्पवयीन मुलगा आणि साथीदारांनी आजीला पाइपने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक रिकिबे अधिक तपास करत आहेत.