कोरेगाव पार्क मध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ७ तरुणींची सुटका

पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पैकी एक असलेल्या कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटरच्या नावाखली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले असून, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने 'एल स्पा' सेंटरवर छापा टाकत या वेश्या व्यावसायाचा पर्दाफाश केला आहे.

    पुणे : पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पैकी एक असलेल्या कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटरच्या नावाखली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले असून, गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ‘एल स्पा’ सेंटरवर छापा टाकत या वेश्या व्यावसायाचा पर्दाफाश केला आहे.

    छापा कारवाईत वेश्याव्यवसायातून ७ तरुणींची सुटका केली. यामध्ये ४ मुली या थायलंड आणि तीन छत्तीसगड येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पा मालक सुरेंद्र जगन्नाथ पाटील (वय ३२, रा. विमाननगर), मॅनेजर शाहरुख अहमद चौधरी (वय २७, रा. जाधवनगर मुंढवा, मु. आसाम) यांना अटक करण्यात आली आहे.

    याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शानाखाली वरिष्ठ निरीभक भरत जाधव त्यांच्या पथकाने केली.

    कोरेगाव पार्क भागातील ज्वेल स्क्वेअर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ‘एला स्पा’ आहे. यात भारतीय व परदेशी मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून याची खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी याठिकाण छापा टाकला.

    सुटका केलेल्या तरुणीमध्ये थायलंडच्या चार तरुणी तर, मिझोरामच्या दोन तरुणी आणि छत्तीसगढच्या एका तरुणीसह एकूण सात जणीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या कारवाईत ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये साडेचार हजारांची रोकड, तीन मोबाईल व अन्य साहित्याचा समावेश आहे. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.