बारामतीत आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द व्यक्त केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले

    बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द व्यक्त केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, अनुषंगाने आमदार पडळकर यांच्या विरोधात बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती शहरातील भिगवन चौक या ठिकाणी आंदोलन करून पडळकर यांच्या प्रतिमेला प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.

    आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने, बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामती शहरातील भिगवन चौक या ठिकाणी आमदार पडळकर यांचा तीव्र निषेध करण्यात आला.

    यावेळी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माळेगावचे संचालक ॲड केशवराव जगताप, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगाव कारखान्याचे संचालक मदनराव देवकाते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अविनाश बांदल,नितीन शेंडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, सुभाष सोमाणी, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, बाजार समितीचे सभापती सुनील पवार, धनवान वदक,माजी नगरसेवक अभिजित काळे, गणेश सोनवणे, संदीप बांदल, दिलीपराव ढवाण, राहुल कदम, श्रीकांत जाधव, ॲड धीरज लालबिगे,शुभम ठोंबरे, शब्बीर शेख तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

    यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते म्हणाले,पडळकर हे जाणीवपूर्वक पवार कुटुंबीयांच्या विरोधात बोलून मिडीया स्टंट करण्यासाठी बेताल वक्तव्य करीत आहेत, तसेच समाजाने दिलेल्या संधीचे सोने करण्यापेक्षा, बेताल वक्तव्य करून समाजाने दिलेल्या संधीची माती करण्याचे काम करीत आहेत ,त्याचा आम्ही बारामतीकर निषेध करत आहोत, यापुढे त्यांनी अशी बेताल वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.