आता मिळणार हक्काच्या सुट्ट्या? कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिका-परिसेवकांचे आंदोलन

दुपारनंतर कर्मचारी युनियन संघटनांचे प्रतिनिधी आणि परिचारिका यांनी एफ दक्षिण येथील कार्यालयात जाऊन कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांचीही भेट घेत, आपल्या समस्या मांडल्या. यावेळी महिन्याला आठ साप्ताहिक सुट्या मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली.

  मुंबई : चार दिवसांपूर्वीच शिवडी (Sewri) येथील क्षयरोग रुग्णालयांतील (Cancer Hospital) कर्मचाऱ्यांनी (Workers) आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले (Agitated for various pending demands). तर गुरुवारी मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिका व परिसेवकांनी देखील आपल्या मागण्यांसाठी आंदाेलन केले (The nurses and attendants of BMC’s Kasturba Hospital also protested for their demands.), सकाळी सुरु झालेल्या आंदाेलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला.

  दरम्यान, दुपारनंतर कर्मचारी युनियन संघटनांचे प्रतिनिधी आणि परिचारिका यांनी एफ दक्षिण येथील कार्यालयात जाऊन कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांचीही भेट घेत, आपल्या समस्या मांडल्या. यावेळी महिन्याला आठ साप्ताहिक सुट्या मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहा. सचिव प्रदिप नारकर यांनी सांगितले.

  सुटट‌्यांमध्ये समानता असली पाहिजे -सहा. सचिव प्रदिप नारकर

  विविध रुग्णालयात सुरु असलेल्या आंदोलनात सर्व संवर्गातील कामगार परिचारिका तसेच परिसेवकांचे प्रश्न अडचणी मांडण्यात येणार आहेत. यावर बोलताना नारकर यांनी सांगितले की, केईएम, नायर, शीव रुग्णालयातील परिचारिकांना आठ साप्ताहिक सुट्या आहेत. मात्र प्रशासनाकडून एका रुग्णालयाला एक तर दुसऱ्या रुग्णालयाला दुसरा न्याय असे का? असा सवाल उपस्थित केला. यात समानता असली पाहिजे असल्याचे नारकर यांनी सांगितले.

  दरम्यान सर्व मनपा सर्वसाधारण रुग्णालये जसे केईएम, नायर, सायन रुग्णालयातील परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना महीन्याला ८ साप्ताहिक सुट्टी दिल्या जातात याच धर्तीवर कस्तुरबा रुग्णालयातील परिचारिका यांना देखील सुटी देण्यात याव्यात या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील परिचारिका आणि परिसेवकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

  त्यामुळे प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. रोजंदारी कामगारांना दिला जात असलेला मानसिक त्रास, केली जात असलेली पिळवणूक दूर करून न्याय देण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

  पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

  दरम्यान यावर तक्ता बनविण्यात येईल अतिरिक्त आयुक्तांना हे सांगण्यात येईल असे सांगत कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे प्रदिप नारकर यांनी सांगितले. दरम्यान आजच्या आंदोलनात म्युनिसिपल मजदुर युनियन, मुंबई सहित, ग्लोबल नर्सिंग युनियन, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना युनियन, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ युनियन या संघटनेचे नेते उपस्थित आहेत.