प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पालघर जिल्हा ओबीसी हक्क समितीच्या (Palghar Jilha OBC Hakk Samiti) वतीने २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे (Protest On Collector Office) आयोजन करण्यात आल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत.

    पालघर : पालघर जिल्हा ओबीसी हक्क समितीच्या (Palghar Jilha OBC Hakka Samiti) वतीने २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे (Protest On Collector Office) आयोजन केले आहे. यावेळेस कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी (Traffic Jam) अथवा अपघाताचा प्रसंग उद्भवू नये याकरिता या मार्गावरील वाहतूक सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे जे मार्ग बंद करण्यात येणार आहेत त्या मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था (Route Change) सुद्धा करण्यात आली आहे.

    या मोर्चासाठी वसई विरार, डहाणू, बोईसर, पालघर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा विविध तालुक्यामध्ये लाखोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक रोजच्याप्रमाणे सुरु ठेवल्यास वाहतूक कोंडी बरोबरीने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या मार्गावरून रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील इतर वाहने बघून वगळून उर्वरित वाहनांना प्रवेश करण्याकरिता मज्जाव करण्यात आला आहे याबाबतची अधिसूचना अप्पर जिल्हा दंडाधिकारी किरण महाजन यांनी जारी केली आहे आहे त्यावेळेस पालघर बोईसर मार्ग बंद करण्यात येणार आहे. सकाळी ११ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे.

    यावेळेस इतरांना अडचण होऊ नये याकरिता पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालघर शहरातून खारेकुरण व दांडेकर कॉलेजकडे जाणाऱ्या वाहनांसाठी टेंभोडे-चाफेकर कॉलेज खारेकुरण कल्याण नाका- हरिजन पाडा- मोरेकुरण मार्गे जातील, बोईसर बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी वाहने कोळगाव रेल्वे फाटक -पोलीस परेड मैदान जेनेसिस इंडस्ट्रियल एरिया नंडोरे नाका येथून पालघर- मनोर मुख्य रस्ता मार्गे जातील, मनोर बाजूकडून बोईसर कडे जाणारी वाहने नंडोरे नाका- जेनेसिस इंडस्ट्रियल- पोलीस परेड मैदान कोळगाव फाटकातून पालघर बोईसर मुख्य रस्ता मार्गाने जातील तर पालघर बाजूकडून बोईसर कडे जाणारी वाहने नंडोरे नाका -जेनेसिस इंडस्ट्रियल एरिया – कोळगाव रेल्वे फाटक -पोलीस परेड मैदान मुख्य रस्ते मार्गे वळविण्यात येणार आहेत.

    ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, महसूल विभागाची वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने, उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही, असे या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.