सर्व्हीस रोड न दिल्यास आंदोलन: सरपंच नवनाथ धायगुडे

सध्या काम प्रगतीपथावर असलेल्या सहापदरी पालखी महामार्गालगत सर्व्हीस रोड नसल्याने बाळुपाटलाची वाडी तालुका खंडाळा येथील शेतकरी आंदोलन छेडण्याचा पवित्र्यात असून तसा ठराव ग्रामसभेस घेण्यात आला असून विशेष भुमी संपादन अधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच नवनाथ धायगुडे यांनी दिली आहे.

    लोणंद : सध्या काम प्रगतीपथावर असलेल्या सहापदरी पालखी महामार्गालगत सर्व्हीस रोड नसल्याने बाळुपाटलाची वाडी तालुका खंडाळा येथील शेतकरी आंदोलन छेडण्याचा पवित्र्यात असून तसा ठराव ग्रामसभेस घेण्यात आला असून विशेष भुमी संपादन अधिकारी कार्यालयाकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच नवनाथ धायगुडे यांनी दिली आहे.

    खंडाळा तालुक्याच्या पुर्व भागातून सध्या पालखी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे काम पुर्ण करत असताना काही ठिकाणी जमिनींचा ताबा घेवूनही बाधित शेतकऱ्यांना अजून मोबदला देण्यात आलेला नाही तर बाळूपाटलाची वाडी हद्दीत खेमावती नदीपात्रातून नदी ओलांडून जाण्यास सर्व्हीस रस्ताच नसल्याने सुमारे पन्नास एकर क्षेत्र वहिवाट करताना शेतकऱ्यांवर अडचण येणार आहे. तसेच शाळकरी मुलांचा व नागरिकांचा येण्याजाण्याचा रस्ता बंद होऊन मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. सदर ठिकाणी सर्विस रोड होणे अत्यंत गरजेचे आहे. सदर बाधित शेतकरी आणि गावकऱ्यांना संबंधित अधिकारी दाद देत नसल्याने संपूर्ण गावाने एकत्र येत ग्रामसभा घेवून रस्त्याचा प्रश्नावर संबंधितांकडून लवकर तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळेस ग्रामपंचायत सदस्या पुष्पा सावंत, सिंधु धायगुडे, सुमन धायगुडे, शोभा धायगुडे तसेच भरत कदम, अमोल कदम, विकास धायगुडे, कांतीलाल धायगुडे आदी मान्यवर ग्रामसेविका स्नेहल शिंदे, तलाठी दळवी , कृषि सहायक अशोक आघाव व बाळु पाटलाचीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

    या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे वाई मतदारसंघाचे नेते डाॅक्टर नितीन सावंत यांनी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्व्हीस रस्ताच्या प्रश्नावर रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे.