Political Drama In Mumbai

विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठीच सोनिया व राहुल यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच राहुल गांधी यांची आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे. त्यामुळं वातावरण तापलं असून आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेसतर्फे आंदोलन व निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

    मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे. पण सोमवारी आणि मंगळवारी एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी (Rahul Gandhi ED Inquiry) सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. तसेच केंद्र सरकार तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध करत आंदोलन केले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी कार्यालयात राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ शेकडो पक्ष कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांनी सोमवारी व मंगळवारी ईडी कार्यालयावर (ED Office) धडकल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी मुंबईत (Mumbai) काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

    दरम्यान, सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे मोदी सरकारचे (Narendra Modi) षडयंत्र असून त्याविरोधात मुंबई आणि नागपूर येथील ईडीच्या ( Mumbai and Nagapur ED office) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठीच सोनिया व राहुल यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच राहुल गांधी यांची आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे.

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होणार असल्यामुळं, वातावरण तापलं असून आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी काँग्रेसतर्फे आंदोलन व निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११.३० वाजता पुन्हा तिसरे आंदोलन आणि निषेध मोर्चा मुंबई काँग्रेस कार्यालय, आझाद मैदान ते इडी कार्यालय, बॅलार्ड पिअर काढण्यात येणार आहे.