मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विरोधात ठाकरे गटाचे आंदोलन, राज्यपाल हटावची मागणी

आज मुंबईत देखील ठाकरे गटाकडून (Thackeray Group) राज्यपालांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच राज्यपाल हटावची मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी आज शिवसेना दक्षिण मुंबईच्यावतीने गिरगाव चौपाटी येथील शिवसेना शाखेजवळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

    मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने हा मुद्धा उचलून धरत राज्यपाल व भाजपावर टिका केली होती. तसेच राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उन्हाळी अधिवेशनात सभागृहात देखील उमटले. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले असून, भाजपाच्या आणि राज्यपालांच्या विरोधात राज्यभरात “जोडो मारो आंदोलन” केलं जात आहे, तसेच राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.

    दरम्यान, आज मुंबईत देखील ठाकरे गटाकडून (Thackeray Group) राज्यपालांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच राज्यपाल हटावची मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी आज शिवसेना दक्षिण मुंबईच्यावतीने गिरगाव चौपाटी येथील शिवसेना शाखेजवळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वातखाली करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी दानवे यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतले. यावेळी विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ, शाखाप्रमुख व महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. तसेच यावेळी बॉक्स बनवून त्यावर राज्यपालांचा फोटो लावून तो बॉक्स समुद्रात बुडविण्यात आला.